ETV Bharat / state

MP Anil Bonde : 31 डिसेंबर 2023 ला अमरावती विमानतळावरून उड्डाण; खासदार अनिल बोंडे यांचा विश्वास - Amravati Airport

गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या अमरावती विमानतळाच्या ( Amravati Airport ) कामाला आता गती आली असून 31 डिसेंबर 23 किंवा त्या आधीच अमरावती विमानतळावरून विमान उड्डाण घेणार असा विश्वास खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त ( Faith of MP Anil Bonde ) केला आहे.

MP Anil Bonde
MP Anil Bonde
author img

By

Published : Oct 28, 2022, 10:41 AM IST

अमरावती : गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या अमरावती विमानतळाच्या ( Amravati Airport ) कामाला आता गती आली असून 31 डिसेंबर 23 किंवा त्या आधीच अमरावती विमानतळावरून विमान उड्डाण घेणार असा विश्वास खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त ( Faith of MP Anil Bonde ) केला आहे. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजनची आढावा बैठक घेऊन अमरावती विमानतळाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची निर्देश संबंधित विभागाला दिले होते.

MP Anil Bonde

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आली गती : अमरावती विमानतळाचे काम गत अनेक वर्षांपासून रखडले आहे. 1 नोव्हेंबर पासून धावपट्टीचे काम सुरू होणार असून 15 नोव्हेंबर पर्यंत हे काम पूर्ण होईल. संबंधित अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली असून या ठिकाणी इमारतीचे काम देखील लवकरच सुरू होणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 15 डिसेंबर पर्यंत इमारतीच्या बांधकामाला देखील सुरुवात होईल असे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. त्या कामासाठी कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याचेही खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले. यामुळे लवकरच अमरावती ते मुंबई आणि अमरावती ते पुणे दरम्यान विमान झेप घेणार असे खासदार बोंडे म्हणाले.

एव्हिएशन सेंटरची मागणी : अमरावती विमानतळाप्रमाणेच अमरावतीत एव्हिएशन अकॅडमी आणि एव्हिएशन हॉस्पिटॅलीटी सेंटर व्हावे अशी आमची मागणी आहे. आता कामाची गती वाढली असून लवकरात लवकर अमरावती विमानतळाचे काम करा अशी विनंती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याचे खासदार डॉ. अनिल बोंड म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.