अमरावती- अमरावती जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून समोर आली आहे. पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवून विजय जवंजाळ या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केला आहे. १२ वर्षीय मुलीने आपली कशीबशी सुटका करीत सर्व घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.या संदर्भात पोलिसांनी आरोपी विजय जवंजाळ याला अटक केली आहे.
तर बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हे देखील नोंदवित आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक तपास शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनचे पोलीस सहायक निरीक्षक पंकज दाभाडे करत आहेत.
हेही वाचा-कोरोनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या 'छमछम'च्या मालकावर गुन्हा दाखल
हेही वाचा-'एटीएमकार्ड' बदलत लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिरवळ पोलिसांकडून पर्दाफाश