ETV Bharat / state

अमरावतीत ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल; माजी मंत्री अनिल बोंडेचा गंभीर आरोप

अमरावती जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा गंभीर आरोप माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

ex minister anil bonde said Oxygen scarecity In amravati hospitals
अमरावतीत ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल; अनिल बोंडेचा आरोप
author img

By

Published : Sep 13, 2020, 9:39 AM IST

Updated : Sep 13, 2020, 10:04 AM IST

अमरावती - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना, सारी आजाराने देखील डोके वर काढले आहे. या दोन्ही आजारांसाठी अनेक रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे. पण जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा गंभीर आरोप माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

अनिल बोंडे बोलताना....

अमरावती शहरातील सुपर स्पेशालिस्ट, डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय, जनरल हॉस्पिटल या तीन रुग्णालयात २५० बेड हे ऑक्सिजनचे आहे. तर खाजगी रुग्णालयात आयसीयू बेडची संख्या १५० आहे. पण शासकीयसह खाजगी रुग्णालयात देखील सिलेंडरचा तुटवडा असल्याची माहिती डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. कोरोना काळात डॉक्टर चांगल्या पद्धतीने काम करत असले तरी त्यांच्या पुढे अनेक समस्या येत असून सारीच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, कोरोना रुग्णांसाठीही ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे, असे बोंडे यांनी सांगितलं.

ग्रामीण आणि शहरी भागातून येणारे कोरोना आणि सारीच्या रुग्णांना वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेड वाढवण्यासाठी मागणी बोंडे यांनी केली. पंजाबराव देशमुख रुग्णालयात सारी आजाराकरिता फक्त १५ बेड उपलब्ध आहेत. परंतु उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे समोर येत असून त्यांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. पण गरीब रुग्ण पैसाअभावी तिथे जात नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयात आयसीयू बेड व ऑक्सिजन सिलेंडर बेडची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे डॉ. बोंडे म्हणाले.

हेही वाचा - अमरावतीत वीज पडून बाप-लेकाचा जागीच मृत्यू;चांदुर बाजार तालुक्यातील घटना

हेही वाचा - अमरावती : अस्वलाचा वनरक्षक अन वनमजुरावर हल्ला, दोघेही गंभीर जखमी

Last Updated : Sep 13, 2020, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.