ETV Bharat / state

खराब राखी फेकल्यानंतर उगवणार झाड; मेळघाटातील आदिवासींची राखी विदेशात जाणार - मेळघाट

अमरावतीच्या धारणी तालुक्यात लवादा गाव आहे. येथे गेल्या अनेक वर्षांपासून बांबूपासून विविध पर्यावरणपूरक शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. आता याच लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून तबल ३० प्रकारच्या पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या जातात.

राखी
author img

By

Published : Jul 11, 2019, 6:29 PM IST

Updated : Jul 11, 2019, 10:09 PM IST

अमरावती - मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवादा गावात संपूर्ण बांबू केंद्राच पर्यावरणपूरक राख्या बनवल्या जात आहेत. राखी खराब झाली की ती फेकून दिली जाते. मात्र, आता ही राखी ज्याठिकाणी फेकली त्याठिकाणी त्या राखीपासून झाड तयार होणार आहे. त्यामुळे यंदा या राख्यांना देशातील अनेक राज्यांसह इतर देशात मागणी आहे.

मेळघाटातील आदिवासींची राखी विदेशात जाणार;पाहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

अमरावतीच्या धारणी तालुक्यात लवादा गाव आहे. येथे गेल्या अनेक वर्षांपासून बांबूपासून विविध पर्यावरणपूरक शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. आता याच लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून तबल ३० प्रकारच्या पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या जातात. बाजारात विक्रीसाठी असलेल्या इतर राख्या सुंदर दिसण्यासाठी त्यावर चकाकणारे मणी लावलेले असतात. मात्र, मेळघाटातील या राख्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. या राख्यांमध्ये बीज टाकलेले आहे. त्यामुळे ही राखी खराब झाल्यावर कुठे फेकली तर या राखीत टाकलेले बीज जमिनीत रोवले जाते. त्यानंतर त्याचे झाड तयार होते. त्यामुळे विदेशातील भारतीय पर्यावरणप्रेमींनी मेळघाटातील आदिवासी महिलांनी बनविलेल्या राख्यांची मागणी केली आहे. त्यांना आता या राख्या पाठवल्या जाणार आहे.

पर्यावरणपूरक राख्यांमुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळाला. तसेच त्यांच्यासोबतच अपंग असलेला युवक सुद्धा राख्या बनविण्याचे काम करतो. त्यामुळे त्यालाही रोजगार मिळाला आहे. याच आदिवासी महिलांनी तयार केलेल्या या राख्या स्वतः या महिलांनी मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधल्या होत्या.

आदिवासी महिलांच्या नावाची राखी -
अनिता, सोनाली, कुसुम, रेश्मा, दीपाली, सरिता, राधा, शोभा हे महिलांचे नावे राख्यांवर दिसले तर आश्चर्यचकीत होण्याची गरज नाही. कारण मेळघाटात बनवण्यात येणाऱ्या ३० हजार प्रकारच्या राख्यांना आदिवासी महिलांची नावे देण्यात आली आहेत. मेळघाटातील लवादा बांबूप्रक्रिया केंद्राअंतर्गत ७ गावातील शेकडो महिलांना राख्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. राखी बनवणाऱ्या महिलेचे नाव त्या राखीला दिले जाणार आहे. याच राख्या यंदा विदेशात सुद्धा जाणार आहेत.

Intro: मेळघाटातील आदिवासी महिलांच्या हातांनी घडवलेल्या राख्या जाणार सातासमुद्रापार.

आदिवासी महिलांनी बनविलेल्या 90 हजार पर्यावरण पूरक राख्या
---------------------------------------------------------------
पॅकेज स्टोरी
अमरावती अँकर-

कुपोषन व बालमृत्यू मूळे सतत चर्चेत राहणाऱ्या व त्यापेक्षाही निसर्ग सौंदर्याची खान असलेल्या मेळघाटातील आदिवासींच्या रोजगारासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.मेळघाटाच्या धारणी तालुक्यातील लवादा गावातील संपूर्ण बांबू केंद्रात बनविलेल्या जाणाऱ्या पर्यावरण पूरक राख्या यंदा देशातील अनेक राज्यासह इतरही देशात जाणार आहे.आदिवासी महिलांच्या हाताला रोजगार देणाऱ्या आणि मेळघाटचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या या पर्यावरण पूरक राख्या आहेत तरी कशा पाहूया ETV भारतच हा स्पेशल रिपोर्ट.

VO-1
अनिता,सोनाली,कुसुम,रेश्मा, दीपाली,सरिता, राधा,शोभा,सावित्री,चंदा,राणी,अंजली,सरस्वती, ललिता,सीमा,सुशीला, नयना, चांदनी हे महिलांचे नावे आपण ऐकतो पण आता तुम्हाला अशाच प्रकारची महिलांची नावे जर तुम्हाला राख्यावर दिसलेत तर विश्वास बसत नाही ना अहो हे अगदी खरं आहे. मेळघाटात बांबु पासून बनविल्या जाणाऱ्या तबल तीस प्रकारच्या पर्यावरण पूरक राख्याना आदिवासी महिलांची नांवे देण्यात आली आहे.मेळघाटातील लवादा बांबू प्रक्रिया केंद्रा अंतर्गत सात गावातील शेकडो महिलांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले असून जी राखी ज्या महिलेने बनवली तिला तिचे नाव दिल्या जाते. आणी याच राख्या यावर्षी विदेशात सुद्धा जाणार आहे.

बाईट-1 महिला

VO-2 
अमरावतीच्या धारणी तालुक्यात लवादा गाव आहे .येथे गेल्या अनेक वर्षांपासून बांबू पासून विविध पर्यावरण पूरक शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. आता याच लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबू पासून वेगवेगळ्या तबल 30 प्रकारच्या पर्यावरण पूरक राख्या या तयार केल्या जातात.आदिवासी महिलांनी  तयार केलेल्या या राख्या स्वतःहा या महिलांनी मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधण्यात आल्या होत्या.

बाईट-2 महिला -मोदी यांना राखी बांधलेली

VO-3
बाजारात विक्रीसाठी असलेल्या इतर  राख्यात  सुंदर दिसाव्या म्हणून  चकाकणारे मणी लावलेले असतात. परंतु मेळघाटातील या राख्याचे एक वेगळे वैशिष्ट्य  ही राखी खराब झाल्यावर जर कुठे फेकली तर या राखीत टाकलेले बीज हे जमीनित उगवते आणि त्याचे झाड तयार होते.

बाईट -3-मुलगी -प्रशिक्षरणार्थी

V0-4
या पर्यावरन पूरक राख्यामुळे आदिवासी महिलांना तर रोजगार मिळाला परन्तु येथे अपंगत्व असलेला युवक सुद्धा राख्या बनविण्याचे काम करतो.त्यामुळे त्यालाही रोजगार मिळाला.

बाईट-4-(हिंदी)अपंग

VO-5
आपल्या भारतील अनेक लोक हे विदेशात नोकरी साठी वास्तव्यास आहे.ज्यांचे पर्यावरनाही अतूट नाते आहे.अशा विदेशात राहणाऱ्या अनेक लोकांनी या मेळघाटातील आदिवासी महिलांनी बनविलेल्या राख्याना मागणी केली आहे .त्यांना आता या राख्या पाठविल्या जाणार आहे.

बाईट-5-डिझाइनर -चष्मा लावलेला मुलगा

VO-6
मेळघाटात कायम रोजगाराची वानवा आहे.मेळघाट सारख्या दुर्गम भागात शिक्षण व्यवस्थेची फारशी सोय नाही.परंतु लवादा या गावात सुरू असलेल्या या संपूर्ण बांबू केंद्राने मात्र महिलांना प्रशिक्षना बरोबरच रोजगाराचेही साधन निर्माण केले आहे. आता गरज आहे ती आपल्या आदिवासी महिलांनी बनविलेल्या सृष्टीबंध राख्याची खरेदी करून मेळघाट चा सन्मान करण्याची 

स्वप्निल उमप
Etv भारत अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jul 11, 2019, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.