ETV Bharat / state

Drought In Melghat : मेळघाटात दुष्काळाच्या झळा.. राणीगावात कोरड्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी कसरत - मेळघाट अमरावती जिल्हा

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट ( Melghat In Amaravati District ) भागात दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली ( Drought In Melghat ) आहे. येथी धारणी तालुक्यात ( Dharni Tahsil Amaravati ) राणीगावात कोरड्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी नागरिकांची कसरत सुरु आहे.

Drought In Melghat
मेळघाटात दुष्काळाच्या झळा
author img

By

Published : May 5, 2022, 9:48 AM IST

अमरावती : मेळघाटात ( Melghat In Amaravati District ) पाण्याचा दुष्काळ ( Drought In Melghat ) असून, धारणी तालुक्यात ( Dharni Tahsil Amaravati ) येणाऱ्या राणी गाव या गावात लगतच्या परिसरात कोरड्या विहिरीत सोडले जाणारे पाणी काढण्यासाठीही ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते आहे.

जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई : मेळघाटात डिसेंबर जानेवारी महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होते .धारणी येथून 35 किमीच्या अंतरावर असलेले राणीगाव येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई निर्माण झाली आहे . 2100 लोकसंख्या असणाऱ्या या गावात आता उन्हाळ्यात तर गावकऱ्यांना पाण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागत आहे. गावात दोन विहीर असून या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

मेळघाटात दुष्काळाच्या झळा.

चार किलोमीटर अंतरावरून गावात आणले जात आहे पाणी : राणी गाव येथे 7 वर्षाआधी 11 किमी अंतरावर असणाऱ्या गोलाई या गावातून पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आता 4 किमी अंतरावर असणाऱ्या कंजोली या गावारून पाईपलाईच्या माध्यमातून पाणी आणून येथील विहिरीत सोडले जाते.

ग्रामस्थ दिवसभर भरतात पाणी : गावातील ग्रामस्थ मिळेल तेव्हा पाणी भरत असतात. दिवसरात्र येथील नागरिक सध्या विहिरीच्या फेऱ्या मारत आहेत. इथे दोन ठिकाणी बोरवेल खोदण्यात आल्या. मात्र, त्या सुद्धा कोरड्याच निघाल्या. गावात नळयोजना आहे पण, पाण्याची सोय नसल्याने ती सुद्धा बंद पडून आहे. भूजल पातळी वाढावी म्हणून गावानजीक तलाव तयार करण्यात आले. परंतु त्याचा सुद्धा काहीही उपयोग झाले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

विहिरीतल्या डबक्यातुन पिणासाठी पाणी : पाऊस पडल्यानंतर साधारणपणे जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी पुरवठा होत असतो. शेतातील विहिरी तसेच बोरवेलला पाणी राहत नसल्याने येथील शेतकरी पिकांकरिता गावातील विहिरीच्या माध्यमातून पाणी देत असल्याने नंतर पाणी टंचाई निर्माण होते. विहिरीत असलेल्या डबक्यातून मिळेल ते पाणी घरगुती वापरासाठी व पिण्यासाठी वापरले जात असल्याचे चित्र राणीगावात पाहायला मिळते.

डोंगरावर टँकर पोहोचणे अशक्य : राणीगाव हे उंच डोंगरावर असल्याने तसेच येथील रस्ता घाटाचा असल्याने बाहेरुन पाणी हे टँकरच्या साहाय्याने पुरवले जाऊ शकत नाही. साधारणपणे 4 किमी घाटाचा रस्ता डोंगरावर चढावा लागतो. टँकरला हा घाट चढणे शक्य नाही.

अनेक गावात अशीच परिस्थिती : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील अनेक गावांमध्ये रानिगाव प्रमाणेच भीषण परिस्थिती आहे. धारणी चिखलदरा या दोन्ही तालुक्यातील गावांमधील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या भागात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी या डोंगराळ भागातील पाणी झपाट्याने वाहून जात असल्यामुळे या भागात नेहमीच पाणीटंचाई राहते.

हेही याचा : Amravati Waterman : भर उन्हात रस्त्याने जाणाऱ्या वाटसरुंची तहान भागवणारा 'वॉटरमॅन'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.