अमरावती - पराभव माहीत असल्याने देवेंद्र भुयार हे नौटंकी करत असल्याचा आरोप कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला. देवेंद्र भुयार हे विविध प्रकारची नाटकं करण्यात पारंगत असल्याचेही बोंडे म्हणाले.
सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं सुरु
लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ही देवेंद्र भुयार यांनी ही स्टंटबाजी केली आहे. त्यांना नौटंकी करण्याची सवय असल्याचे बोंडे म्हणाले. या नौटंकीला कुठेही बळी पडू नका असे आवाहन बोंडे यांनी यावेळी मतदारांना केले.
मोर्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातह हल्ला झाला आहे. यामध्ये त्यांची चारचाकी गाडी पूर्णत: जळून खाक झाली आहे. यामध्ये भुयार थोडक्यात बचावले. भुयार हे कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.