अमरावती - जिल्ह्यात सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी जशी भटकंती करावी लागते आहे, तशीच भटकंती प्राण्यांनाही करावी लागत आहे. दर्यापूर तालुक्यातील खल्लार या गावामध्ये पाण्याच्या शोधात आलेल्या मादी जातीच्या हरिणावर कुत्र्याने हल्ला चढवला. तेव्हा गावकऱयांनी हरिणाला कुत्र्यापासून वाचवले. त्यानंतर हरिणाने एक लहान पिलाला जन्म दिला.
दर्यापूर तालुक्यातील खल्लार या गावामध्ये एक हरिण पाण्याच्या शोधात गावाजवळ आले. हरिण पाणी पित असताना मोकाट कुत्र्यांनी हरिणावर हल्ला चढवला. ही बाब उपस्थित नागरिकांच्या लक्षात येताच उपस्थितांनी हरिणाला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि हरिणाला कुत्र्यापासून वाचवले. जखमी हरिणाला गावकऱ्यांनी गावात घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी परतवाडा येथील वनविभाग अधिकाऱ्यांना प्रकाराबद्दल माहिती दिली.
वनविभाग अधिकारी गावात पोहोचेपर्यंत हरिणाने एका गोंडस पिल्लाला जन्म दिला. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी हरिणाला कुत्र्यापासून वाचविल्यामुळे नागरिकांचे कौतुक केले.