ETV Bharat / state

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला, डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक - अमरावती खून

अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमध्ये एका डॉक्टवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. खासगी रुग्णालयात या डॉक्टवर उपचार सुरू आहेत.

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला, डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक

author img

By

Published : Nov 29, 2020, 8:58 AM IST

Updated : Nov 29, 2020, 10:31 AM IST

अमरावती - गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला झालाय. यात डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयाच्या कॉर्टरमध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. मनोज सांगळे असं प्राणघातक हल्ला झालेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर अमरावतीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला

आराम करत असलेल्या डॉक्टरांवर अचानक हल्ला

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मधील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालय मध्ये मनोज सांगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे कालही रुग्णालयात आपले काम केल्यानंतर रुग्णालयातच असलेल्या त्यांच्या कॉर्टरमध्ये आराम करायला गेले. अशातच रात्री साडेबाराच्या सुमारास दवाखान्याचा मागील गेटमधून काही हल्लेखोरांनी आता शिरून त्यांच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. हल्लेखोरांनी नंतर पळ काढला. हल्लेखोरांनी केलेला हल्ला एवढा भयंकर होता की, मनोज सांगळे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्यावर उपचार सुरू

अशातच त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला फोन करून झालेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर मनोज सांगळे यांना उपचारासाठी तात्काळ अमरावतीला रवाना करण्यात आले. अमरावतीमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे चार वाजता घटनास्थळी धाव घेतली असून सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

हेही वाचा - छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ला, जखमी असिस्टंट कमांडंट हुतात्मा, 10 जवान जखमी

हेही वाचा - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषीच्या सीईटीचा निकाल जाहीर; पुण्यातील अनिश जगदाळे आणि सानिका घुमास्ते राज्यात टॉपर

Last Updated : Nov 29, 2020, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.