अमरावती Devendra Fadnavis On Modi Govt : अमरावतीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर देशात विकासाचे अनेक काम झाले आहेत. गत दहा वर्षात अमरावती जिल्ह्यात कधी नव्हे इतके विकासाचे काम झाले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्यामुळे आमचं सरकार देखील खासदार नवनीत राणा यांच्या पाठीशी आहे. माझा दावा आहे नवनीत राणा यांच्याप्रमाणे जो कोणी नेता मोदींवर प्रेम करणारा असेल, त्याला जनता निश्चितपणे डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं अमरावतीत आयोजित विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास अमरावतीला आले होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी प्रतीकात्मक दहीहंडी फोडून या स्पर्धेचं उद्घाटन ( Devendra Fadnavis On Modi Govt in Amravati) केलं.
हिंदुत्वावर टीका करणाऱ्या स्टॅलिनला इशारा : तामिळनाडूतील डीएमके पक्षाचा नेता स्टॅलिन याने कोविड डेंग्यू मलेरियाप्रमाणं हिंदुत्वाला संपवलं पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. या टीकेचा आम्ही निषेध करतो. आम्ही कधीही धर्माचं राजकारण केलं नाही. आम्ही 'सर्व धर्म समभाव' या नात्याने वागतो. मात्र स्टॅलीनने जी काही हिंदुत्वावर टीका केलीय, त्या टीकेला त्याच्या हयातीत सर्व हिंदू हे जगात विविध क्षेत्रात हिंदुत्वाचा झेंडा रोवून उत्तर देईल, असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Amravati Dahi Handi Programme) म्हणालेत.
अमरावतीच्या विकासाचा वाचला पाढा : गत दहा वर्षांत अमरावतीचा यापूर्वी कधीही झाला नाही, इतका विकास झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अमरावतीत आता विमान लवकरच विमानतळावरून झेप घेईल, यासह अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील मंजूर झाले आहेत. ते लवकरच सुरू होतील. टेक्स्टाईल पार्कचा विकास अमरावतीत झपाट्याने होतो आहे. टेक्स्टाईल कंपनीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळालाय. आता नव्या टेक्स्टाईल पार्कमुळे एकूण तीन लाख युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis latest update) सांगितलंय.
हेही वाचा :
- Devendra Fadnavis : निवडणूक शपथपत्र प्रकरण; देवेंद्र फडणवीसांची नागपूर न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- Maratha Reservation Protest : मराठा आंदोलक आक्रमक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत रात्री उशिरा 'खलबतं'
- Devendra Fadnavis On India Alliance : देश वाचवण्यासाठी नाही तर...देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीवर टीका