अमरावती - जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदार संघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्यात अटीतटीची लढत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. सुनील देशमुख यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता मात्र, सोपी नाही असे चित्र स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुलभा खोडके यांनी प्रचारात आघाडी घेतली असून डॉ. सुनील देशमुख यांच्यासमोर खोडके यांचे तगडे आव्हान आहे.
हेही वाचा - विरारमध्ये अनाधिकृत इमारतीचा भाग कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू
अमरावतीत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणारी सभा ही या मतदार संघात होणारी मोठ्या नेत्याची ही पहिलीच सभा आहे. शहरातील नेहरू मैदानात मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी व्यवस्था करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेनंतर अमरावती मतदारसंघात निवडणुकीत आणखी रंग भरणार आहे.