ETV Bharat / state

दर्यापुरात क्वारंटाईन सेंटरमध्ये होतेय डॉक्टरांची गैरसोय - दर्यापूर क्वारंटाईन सेंटर न्यूज

दर्यापूर येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. चार दिवसांपूर्वी ही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पालिका प्रशासनाच्यावतीने वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

MLA Balwant Wankhade
आमदार बळवंत वानखडे
author img

By

Published : Jul 8, 2020, 1:40 PM IST

अमरावती - राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. महामारीच्या काळात आपल्या जीवाची कुठली पर्वा न करता डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत. अमरावतीत मात्र, याच डॉ़क्टरांची अवहेलना होत असल्याचे समोर आले.

दर्यापूर येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. चार दिवसांपूर्वी ही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पालिका प्रशासनाच्यावतीने वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे कोविड योद्धांची जर अशी दुरावस्था होत असेल तर क्वारंटाईन केलेल्या इतर नागरिकांची आणि रुग्णांची काय अवस्था असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकाराची महिती दर्यापूर मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांना मिळताच त्यांनी भेट देऊन सर्व परिसराची पाहणी केली. डॉक्टरांना चांगल्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आदेश आमदार वानखडे यांनी नगरपालिकेला दिले.

अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही 700 वर पोहचली आहे. मागील 15 दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची सरासरी संख्या दररोज 20 ने वाढत आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढत असतानाही कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन हवे तितके गंभीर नसल्याचे चित्र आहे. तर नागरिकही बिनधास्तपणे सर्रास नियमांचे उल्लंघन करत बाहेर गर्दी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.