ETV Bharat / state

अमरावती : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी (दि. 7 मे) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली तर अनेक ठिकाणी गारपिटीचा जबर फटका बसला. या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कांदा, आंबा सह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 8, 2021, 8:23 PM IST

अमरावती - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी (दि. 7 मे) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली तर अनेक ठिकाणी गारपिटीचा जबर फटका बसला. या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कांदा, आंबा सह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर हे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामातील कांदा आंबा आदी पिकांवर होती. पण, काल (शुक्रवारी) आलेल्या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पुरता नांगर फिरवला आहे.

अमरावती : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान
अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावातील रुपेश कांडलकर या युवा शेतकऱ्याच्या शेतातील कांदा पिकांचे प्रचंड नुकसान पावसामुळे झाले आहे. रुपेश कांडलकर हे उच्चशिक्षित असून गेल्या अनेक वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. पण, नोकरी लागली नाही शेवटी तो शेतीकडे वळला. या युवा शेतकऱ्याने या वर्षी दोन एकरावर खरीप हंगामात सोयाबीनचे पीक लावले होते. पण, अतिवृष्टीमुळे व इतर रोगांमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. त्यामुळे सोयाबीनमध्ये झालेले नुकसान यंदा कांद्यातून पिकातून भरून काढण्यासाठी त्यांनी एक एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. जंगली जनावरांचा त्रास असल्याने दिवस-रात्र कांद्याचे रक्षण केले आता कांद्याचे पीकही जोमात आले होते दोन दिवसांपूर्वीच मजुरांच्या हाताने कांदा काढून तो पगर लावून टाकला होता. पण, पावसाने व वादळी वाऱ्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि कांदा पूर्ण भिजून सडण्याच्या मार्गावर लागला. कांदा पिकासाठी रुपेशने उसनवार पैसे आणून तब्बल 60 हजार रुपये लावले होते. त्यातून जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न होईल ही भाबडी आशा त्याला होती. कांदा विकून खरीप हंगाम करायचा ही त्यांची तयारी होती. पण, आता कांद्याच्या झालेल्या नुकसानीमुळे मात्र खरीप हंगाम कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

अशीच परिस्थिती या गावातील शेतमजूर ईबाद मुल्ला यांची आहे. इबाद मुल्ला हे शेतमजूर आहेत. शेत मजुरीवर पाच लोकांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह पूर्णपणे होत नसल्याने कुटुंबाला हातभार लागावा म्हणून ते गेल्या अनेक वर्षांपासून आंब्याचा व्यवसाय करतात. ते शेतकऱ्यांकडून काही दिवसांसाठी आंब्याचे झाड खरेदी करतात. त्याची दिवस-रात्र राखण करून त्यातून त्यांना काही रुपयांचा नफा होतो. पण, काल रात्रीच्या वादळी पावसामुळे झाडावरील संपूर्ण आंबा खाली गळून पडल्याने तब्बल 25 ते 30 क्विंटलपेक्षा आंब्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यावे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे.

हेही वाचा - दारुवाल्यांचा शरद पवारांना कळवळा येतो पण.. - अनिल बोंडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.