ETV Bharat / state

अमरावतीत नोकरीचे आमिष दाखवून चौघांचा तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

author img

By

Published : Nov 9, 2020, 10:03 PM IST

अमरावती महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात फ्रेजारपुरा पोलिसांनी पालिका कर्मचाऱ्याला अटक केली असून, फरार असलेल्या अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime against four in rape case at Amravati
नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार

अमरावती - अमरावती महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात फ्रेजारपुरा पोलिसांनी पालिका कर्मचाऱ्याला अटक केली असून, अन्य तिन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महापालिकेत कंत्राटी कर्मचारी असणाऱ्या प्रदीप नितनवरेची प्रतीक नावाच्या तरुणाने त्याच्या मैत्रिणीशी ओळख करून दिली होती. तेव्हा महापालिकेत जागा आहे. मी तुला नोकरी लावून देतो. तू तुझे सर्व शैक्षणिक कागदपत्रं घेऊन माझ्याकडे ये, असे आरोपीने या मुलीला सांगितले. त्यानुसार सर्व कागदपत्रे घेऊन ती त्याच्याकडे आली. यावेळी प्रदीपने तिला गुंगीचे औषध घातलेले पाणी प्यायला दिले. ती बेशुद्ध पडल्यावर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्यानंतर या मुलीला बॅकमेल करून तो वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. एक दिवस माझ्या काही वरिष्ठांना तू शरीरसुख दे, त्यानंतर मी तो व्हिडीओ कायमचा डिलिट करतो, असे त्याने या मुलीला सांगितले. त्यानंतर अन्य तिघांनी देखील तिच्यावर अत्याचार केला.

आरोपीला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकाराविरोधात तरुणीने रविवारी रात्री फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेत, प्रदीप नितनावरे याला ताब्यात घेऊन सोमवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने प्रदीपला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.