अमरावती - पक्षी संवर्धनासाठी यावर्षीपासून पहिल्यांदाच शासकीय स्तरावर पक्षीसप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या पक्षीसप्ताह निमित्त मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वन्यजीव विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आंतरविभागीय क्रिकेट सामने आयोजित केले आहे. परतवाडा येथे मेळघाट वन्यजीव कार्यालयासमोर हे क्रिकेट सामने खेळविले जात आहे.
पक्षीमित्रांची तीव्र प्रतिक्रिया
पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवस 5 नोव्हेंबर आणि बर्डमन अशी ख्याती असणारे डॉ. सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबररोजी असते. या सप्ताहादरम्यान पक्षीसप्ताह साजरा करण्यात येतो. पक्षांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी व तुणचे अधिवास, पक्षांचे स्थलांतर, त्यांच्या अधिवसाचे संरक्षण, पक्षीसंरक्षण व संवर्धन कायद्याविषयाची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित असताना पक्षीसप्ताहच्या नावाने क्रिकेटचे सामने आयोजित करण्याचा प्रकार अयोग्य असल्याचे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे प्रमुख प्रा. डॉ. जयंत वडतकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
हेही वाचा- अमेरिकेच्या नव्या कारभाऱ्यांचे पहिले भाषण... स्पष्ट बहुमताबद्दल नागरिकांचे मानले आभार