अमरावती - राज्यात कोरोना महामारीने लोक त्रस्त आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेडसुद्धा उपलब्ध नाही. रुग्णांकडून अधिकचे पैसे घेऊन कोरोनाबाधितांवर उपचार केल्या जात असल्याच्या घटना समोर आल्या आहे. अमरावतीच्या परतवाडामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भामकर कोविड रुग्णालयामध्ये रुग्णांकडून अधिक पैसे घेवून त्यांना पक्के बिल न देता कच्चे बिल देण्यात येत आहे. शिवाय रुग्णांकडून अधिकची लूट होत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
'त्या' रुग्णालयावर कारवाई करा'
जिल्ह्यातील पांढरी येथील रामदास आवरे यांना कोरोनची लागण झाल्यानंतर त्यांना अमरावती येथील PDMC रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यावेळी भामकर हॉस्पिटलने ५७ हजार रुपये बिल जमा करण्यास सांगितले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचे बिल न देता साध्या वहीच्या कागदार हिशोब लिहून दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून भामकर हॉस्पिटलकडून लूट झाली आहे, सोबतच अनेक रुग्णाची हॉस्पिटलकडून लूट होत आहे, असा आरोप करत हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा-पुण्यात उघडली ऑक्सिजन लायब्ररी! पोस्टकोविड रुग्णांसाठी ठरणार फायदेशीर