अमरावती : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द करणे याचे मी वैयक्तिक पातळीवर स्वागत करतो. मात्र, हा निर्णय घेताना जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना विश्वासात घेणे अतिशय आवश्यक होते. काश्मीरमध्ये कर्फ्यू हा काही नवीन नाही. सध्याही कर्फ्यू आहे. महाराष्ट्राबाबत एखादा निर्णय घेण्यात आला आणि याची माहिती महाराष्ट्राच्या लोकांना दिली नाही, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करा. असेच काहीसे जम्मू-काश्मीरमध्ये झाले आहे. त्यामुळे त्याचे परिणाम भयावह होऊ शकतात, अशी भीती जेष्ट पत्रकार आशुतोष यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - अमरावतीत संत्रा मंडीला आग; चार हजार कॅरेट संत्रा जळून खाक
भारती महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने 'कलम 370 आणि भविष्य' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. आज भारतीय विद्या मंदिराचे अध्यक्ष आर बिडवे यांच्या अध्यक्षतेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आर्टिकल 370 वास्तव आणि भवितव्य या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांनी महत्त्वाची माहिती दिली.
काश्मीरमध्ये जी काही समस्या निर्माण झाली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. यासाठी कोणी एक व्यक्ती अजिबात जबाबदार नाही. अनेकजण म्हणतात काश्मीरची समस्या ही नेहरूंमुळे निर्माण झाली, खरेतर काश्मीरची डोकेदुखी नेहमीपेक्षा अनुभवी असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतासोबत नको होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जम्मू आणि लडाख भारताची जोडावे आणि काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावा, असे नमूद केले आहे. आर्टिकल 370 नुसार जम्मू-काश्मीर भारताशी जोडला गेला. या आर्टिकल 370 ला संपूर्ण काँग्रेसचा विरोध होता. केवळ सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन आर्टिकल 370 द्वारे काश्मीरला भारताशी जोडण्यास महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे आशुतोष म्हणले.
हेही वाचा - राजकीय नेत्यांच्या नव्हे तर मतदारांच्या भरवशावर खासदार झाले; नवनीत राणांचा विरोधकांना टोला
2014 च्या निवडणुकीनंतर काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलायला लागली. जम्मू-काश्मीर लिबरल फ्रंट आणि भारतीय जनता पक्ष हे 2 परस्पर विचारांचे पक्ष एकत्र येऊन काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली. वास्तवात 2 विचारांचे व्यक्ती दोन विचारांचे वाद आणि 2 विचारांचे पक्ष हे कधीही एकत्र यायला नकोत. त्यामुळे विचारसरणीला खीळ बसते. मात्र, भाजप आणि जम्मू-काश्मीर लिबरल फ्रंट यांनी एकत्र येऊन मोठी चूक केल्याचे आशुतोष म्हणाले.
भारताचे विभाजन मान्य नसणारे आणि भारत अखंड आहे, असे म्हणणारे आता त्यांच्याविरोधात कोणताही विचार व्यक्त केला. तर, तुम्ही पाकिस्तानात निघून जा, अशी भाषा करत आहेत, हे हास्यास्पद आहे, असा टोलाही आशुतोष यांनी लगावला.