ETV Bharat / state

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नवनीत राणांकडून घेतले एकनिष्ठेचे आश्वासन

author img

By

Published : Mar 27, 2019, 7:33 PM IST

Updated : Mar 27, 2019, 11:50 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या विजयी झाल्यावर भाजपत तर जाणार नाहीत, तसेच जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसमध्ये ढवळा-ढवळ करून विधनसभा निवडणुकीत दर्यापूर आणि मेळघाट मतदारसंघात काँग्रेसला अडथळा तर आणणार नाहीत, अशा विविध शंकांचे निरसन करून काँग्रेसने आमदार रवी राणा आणि लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून एकनिष्ठेचे आश्वासन घेतले.

नवनीत राणा

अमरावती - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या विजयी झाल्यावर भाजपत तर जाणार नाहीत, तसेच जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसमध्ये ढवळा-ढवळ करून विधनसभा निवडणुकीत दर्यापूर आणि मेळघाट मतदारसंघात काँग्रेसला अडथळा तर आणणार नाहीत, अशा विविध शंकांचे निरसन करून काँग्रेसने आमदार रवी राणा आणि लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून एकनिष्ठेचे आश्वासन घेतले.

अमरावती

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आज जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकऱ्यांचा मेळावा नवसरी परिसरात आयोजित केला होता. यावेळी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी आमदार खतीब, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा, नवनीत राणा, माजी आमदार केवलराम काळे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
यावेळी बबलू देशमुख यांनी, नवनीत राणा खासदार झाल्या तर आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी त्या बडनेरा मतदारसंघासह दर्यापूर आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात काम करतील. यासोबतच नवनीत राणा निवडून आल्यावर भाजपसोबत गेल्या तर हा काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मोठा घात होईल, अशी भीतीही बबलू देशमुख यांनी व्यक्त केली.

आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, आमच्या रक्तात काँग्रेस भिनलेली आहे. पक्षाचा आदेश आम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. सत्ताधाऱ्यांनी आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना प्रचंड दुखावले आहे. अशावेळी लोक म्हणतात, रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, ही बाब आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना खूप खटकणारी आहे. नवनीत राणा या काँग्रेस विचारधारेशी प्रामाणिक राहणार असतील, तर जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे कामाला लागेल.

बबलू देशमुख आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करताना नवनीत राणा म्हणाल्या, जात आणि धर्मभेद हा माझ्या रक्तात नाही. यामुळे भेदभावाचे राजकारण करणाऱ्या भाजपसोबत मी कधीही जाणार नाही. आम्हाला अमरावतीत अडसुळांचा पराभव करायचा नसून देशात मोदींचा पराभव करायचा आहे, असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

आमदार रवी राणा म्हणाले, जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांच्या मदतीला धाऊन जाणारा एकमेव आमदार आहे. जाती, धर्मभेद मी कधीही मानत नाही. माझे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत, असे बोलले जाते. खरे तर मी अपक्ष आमदार असल्याने जनतेच्या कामासाठी मला मुख्यमंत्र्यांच्याजवळ जावेच लागते. यापूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा माझे चांगले संबंध होतेच. आता मात्र, मोदींचा पराभव करून राहुल गांधी आणि शरद पवार यांना बळ देणे हेच आमचे ध्येय आहे.

आमदार रवी राणा आणा नवनीत राणा यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनातील प्रश्नांचे समाधान केल्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी नवनीत राणा यांना विजयी करण्याचे आवाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केले.

Intro:काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवस्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या विजयी झाल्यावर भाजपात तर पळणार नाहीत, तसेच जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसमध्ये ढवळा ढवळ करून विधनसभा निवडणुकीय दर्यापूर आणि मेळघाट मतदार संघात काँग्रेसला अडथळा तर आणणार नाही अशा विविध शंकांचे निरसन करून आमदार रवी राणा आणि लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून एकनिष्ठेचे आश्वासन घेतले.

Body:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आज जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकऱ्यांचा मेळावा नवसरी परिसरात आयोजित केला होता. यावेळी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी आमदार खतीब आमदार यशोमती ठाकूर ,आमदार रवी राणा, नवनीत राणा, माजी आमदार केवलराम काळे यांच्यासह जिल्ह्यातील कंग्रेसचे पदाधिकारी आणि जेष्ठ मंडळी उपस्थित होते.
यावेळो बबलू देशमुख यांनी जर नवनीत राणा या जिल्ह्याच्या खासदार झाल्या तर आमदार रवी राणा हे त्यांच्या युबस्वाभिमान पक्षासाठी त्यांच्या बडनेरा मतदार संघसह दर्यापूर आणि मेळघाट विधानसभा मतदार संघ युवस्वाभिमानसाठी माघून काँग्रेस कार्यकर्त्यांची संधी हिरावून घेतील अशी भीती अनेकांना आहे. यासोबतच जर नवनीत राणा या निवडून आल्यावर भाजपसोबत गेल्या तर हा काँग्रेस कार्यकेत्यांसोबत मोठा घात होईल अशी भीतीही बबलू देशमुख यांनी व्यक्त केली.
आमदार यशोमती ठाकूर यांनी आमच्या रक्तात कंग्रेस भिनलेली आहे. पक्षाचा आदेश आम्हाला अतिशय महत्वाचा आहे. सत्ताधाऱ्यांनी आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि नेते राहील गांधी यांना प्रचंड दुखवल आहे. आशा वेळी लोक म्हणतात रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या जवळजे आहेत. ही बाब आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना खूप खटकणारी आहे. नवनीत राणा या काँग्रेस विचारधारेशी प्रामाणिक राहणार असतील तर जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे कामाला लागेल असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
बबलू देशमुख आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थीत केलेल्या शंकांचे निरसन करताना नवनीत राणा यांनी जात आणि धर्मभेद हा माझ्या रक्तात नाही. यामुळे भेदभावाचे राजकारण करणाऱ्या भाजपसोबत मी कधीही जाणार नाही. आम्हाला अमरावतीत अडसुळांचा पराभव करायचा नसून देशात मोदींचा पराभव करायचा आहे असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
आमदार रवी राणा म्हनाले जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांच्या मदतीला धाऊन जाणारा एकमेव आमदार आहे. जाती, धर्मभेद मी कधीही मानत नाही माझे मुख्यमंत्रयांसोबत चांगले संबंध आहेत असे बोलले जाते. खर तर मी अपक्ष आमदार असल्याने जनतेच्या कामासाठी मला मुख्यमंत्र्याजवळ जावंच लावते. यापूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा माझे चांगले संबंध होतेच. आता मात्र मोदींचा पराभव करून राहुल गांधी आणि शरद पवार यांना बाळ देणे हेच आमचे ध्येय असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.
आमदार रवी राणा आणा नवनीत राणा यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनातील प्रश्नांचे समाधान केल्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी नवनीत राणा यांना विजयी करण्याचे आवाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केले.

Conclusion:
Last Updated : Mar 27, 2019, 11:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.