अमरावती - अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur )यांनी उमेश कोल्हे ( Umesh Kolhe ) हत्या प्रकरणाचा राणा दाम्पत्य इव्हेंट करीत असल्याचे आरोप केले. ते अतिशय चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. वास्तवात कोल्हे आणि राणा कुटुंबीयांचे अतिशय जवळचे संबंध ( close relationship between Kolhe Rana )असून या कौटुंबिक संबंधातूनच दोन महिन्यांपूर्वी उमेश कोल्हे यांचे लहान बंधू आपल्या कुटुंबासोबत दिल्लीला खासदार नवनीत राणा यांच्या घरीच मुक्कामी होते. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ज्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्या दुःखाचे करणे देऊन राणा दांपत्य हे इव्हेंट करीत असल्याचा आरोप सपशेल चुकीचे असल्याचे युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाप्रमुख जितू दुधाने ( Yuva Swabhiman Sanghatana District Head Jitu Dudhane ) यांनी म्हटले आहे.
पत्रावरची तारीख ही प्रिंटिंग मिस्टेक - उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एनआयएकडून तपास व्हावा अशी मागणी सर्वात आधी खासदार नवनीत राणा यांनी केली होती. त्या संदर्भात त्यांनी 29 जून रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र देखील दिले होते. या पत्रावर आधी 27 जून अशी तारीख म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक होती. ही चूक दुरुस्त करूनच खासदार नवनीत राणा यांनी अमित शहा यांना पत्र पाठवले होते. मात्र आमच्याकडून कोणीतरी 27 जून रोजी चेच पत्र वायरल केल्यामुळे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर या अशा पत्राचा आधार घेऊन चुकीचे राजकारण करीत असल्याचे देखील जितू दुधाने म्हणाले.
इरफान खान हा शिवसैनिक - उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खान ( main accused Irfan Khan ) हा आमच्या युवा स्वाभिमान संघटनेचा कधीही कार्यकर्ता नव्हता. मात्र यशोमती ठाकूर यांच्याकडून इरफान खान हा प्राणांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप चुकीचा आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला असताना अमरावतीत पठाण चौक येथे शिवसेनेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचा पुतळा जाळला होता. त्यावेळी सर्वात आघाडीवर इरफान खानच होता. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने 27 जुलै 2022 रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. त्यावेळी शहरात लागलेल्या फलकांवर उद्धव ठाकरे यांच्या फोटो सोबतच शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे आणि रायबर हेल्पलाइनचे इरफान खान याचा फोटो देखील झळकला होता. याचा पुरावा देखील जितू दुधाने यांनी पत्रकार परिषदेत सादर केला.
काय आहे प्रकरण - नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे ( Nupur Sharma Social media Post) अमरावती शहरातील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे ( Pharmacist Umesh Kolhe ) यांची 21 जून रोजी रात्री साडेदहा वाजता हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात एकूण सात जणांना ( seven arrested Umesh Kolhe murder case ) पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास आता अमरावती पोलिसांकडून एएनआयकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान अमरावती शहरात एकूण तीन व्यक्तींना नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे धमकी मिळाली असल्याचे समोर आले आहे. एकाच व्यक्तीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रामपुरी कॅम्प परिसरातील या व्यक्तीला दिवसभर एका पोलिसाचे संरक्षण देण्यात आले. शुक्रवारी रात्री ही व्यक्ती आपल्या दुकानातून घरी पोहोचली असताना त्यांच्या घराची सहा जणांनी रेकी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्या संरक्षणासाठी असणारा पोलीस कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाला असताना त्याला एकूण सहा जण संशयित्रीच्या तक्रारदार व्यक्तीच्या घराच्या परिसरात दिसले. या सहाही व्यक्तींची हालचाल संशयास्पद असल्याचे, कळतात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना सूचित केले.
हत्येचा तपास एनआयएकडे - नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता, हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे.
हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : माझ्या भावाच्या हत्येचा इव्हेंट करू नका - महेश कोल्हे