अमरावती - चांदूर बाजार शहरतील गुलजार पेठ परिसरात वाट दाखवताना गाडीच्या क्लिनरचा त्याच वाहन व भिंती दरम्यान चेंगरून क्लीनरचा मृत्यू झाला आहे. अमर सुभाष शेकोकर (वय 25 वर्षे, रा. तळेगाव मोहना), असे मृत क्लिनरचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालक जावेद खान जमीरउल्ला खान (वय 40 वर्षे, रा. काजीपुरा, चांदूर बाजार) याच्या हलगर्जीपणामुळे घटना घडली असल्याचा आरोप करत मृताच्या चुलत भावाने चांदूर बाार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रात्रीच्या अंधारात वाळूची तस्करी
तालुक्यात रात्रीच्या अंधारात चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जाते. या अवैध वाहतुकीत महसूल व पोलीस प्रशासनापासून बचावासाठी वाळू माफिया अंदाधुंद वाहन चालवतात. यामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना तालुक्यात घडल्या आहेत.
चांदूर बाजार तालुक्यातील जावेद खान जमीरउल्ला खानचा अवैध रेती विक्रीचा व्यवसाय आहे. त्यानुसार अंधारात, चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करुन वाहतूक केली जाते. 29 जानेवारीच्या मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास गुलजार पेठ परिसरात जावेदने आपल्या मालवाहू मोटारीतून वाळू रिकामी केली. वाहन काढताना अमर हा जावेदला वाहनाची दिशा सांगत (साईड दाखवत) होता. त्यावेळी जावेदने निष्काळजीपणे वाहन चालवली. त्यामुळे वाहन व भिंतीच्या मध्ये चेंगरून अमरचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ अक्षय विलासराव शेगोकार यांने चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून आरोपीला अद्याप अटक झाली नाही.
हेही वाचा - निधी अखर्चित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची - ॲड. यशोमती ठाकूर