ETV Bharat / state

अमरावतीत बोगस बियाणे, 200 हेक्टरवरील मिर्ची खराब; शेतकऱ्यांचा कंपनी विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा - मिर्ची पिक खराब

अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील संत्री उत्पादक शेतकरी संत्री गळतीमुळे संकटात आहेत. त्यातच वरुड तालुक्यातील शेकडो मिर्ची उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या संकटात सापडलेले आहेत. मोठ्या विश्वासाने शेतात लावलेले मिर्चीचे बियाणे बोगस निघाले आहेत. त्यामुळे मिर्चीच्या झाडांची वाढ खुंटली आहे. शेतकरी कंपनीच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

अमरावतीत 200 हेक्टरवर मिर्ची पीक खराब
अमरावतीत 200 हेक्टरवर मिर्ची पीक खराब
author img

By

Published : Sep 10, 2021, 10:40 AM IST

अमरावती : एकीकडे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील संत्री उत्पादक शेतकरी संत्री गळतीमुळे संकटात आहेत. त्यातच वरुड तालुक्यातील शेकडो मिर्ची उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या संकटात सापडलेले आहेत. मोठ्या विश्वासाने शेतात लावलेले मिर्चीचे बियाणे बोगस निघाले आहेत. त्यामुळे मिर्चीच्या झाडांची वाढ खुंटली आहे. उत्पादनही शून्य असल्याचा गंभीर आरोप या शेतकऱ्यांनी बियाणे कंपनीवर केला आहे. जवळपास दोनशे हेक्टरवरील मिर्ची पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांनी बियाणे कंपनी विरोधात थेट कृषिमंत्री दादाभुसे यांच्याकडे तक्रार केली आहे. जर नुकसान भरपाई दिली नाही तर कंपनी विरोधात थेट न्यायालयात जाण्याचा इशाराही या संतप्त मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

अमरावतीत 200 हेक्टरवर मिर्ची पीक खराब

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बहादा परिसरातील शेतकऱ्यांनी २० मे रोजी सीजेंटा कंपनीच्या मिर्ची बियाण्याच्या रोपांची लागवड आपल्या शेतात केली होती. एक महिना उलटल्यानंतर शेतकऱ्यांनी २० जूनच्या दरम्यान शेतात मिर्चीची लागवड केली. त्यानंतर खत महागडे फवारणी असे प्रत्येक शेतकऱ्यांने तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केले. परंतु अचानकच यावर्षी या मिर्चीच्या झाडांची वाढ खुंटल्याने व झाडे करपून गेल्याने मिर्चीचे पीक हातातून गेले. त्यामुळे लाखो रुपये अपेक्षित असलेल्या या मिर्ची पिकातून मात्र यंदा लावलेले पैसेही निघणार की नाही याची हमी आता राहिली नाही. दरम्यान कंपनीने बोगस बियाणे दिल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बियाणे कंपनीचा अजब सल्ला व उडवाउडवीची उत्तरं

या बोगस मिर्ची बियाण्यांसंदर्भात बहादा येथील शेतकरी सुनील वानखडे यांनी सीजेंटा कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. त्यांतरही या कंपनीचे लोक पाहणी करायला आले नाहीत. त्यानंतर पुन्हा सुनिल वानखडे यांनी कंपनीला संपर्क केला. बियाणे कंपनीचा एक व्यक्ती आला. त्याने पाहणी करून थेट मिर्ची शेतातून उपडून टाकण्याचा सल्ला दिला. तसेच, उडवाउडवीचीही उत्तरं दिली असलाचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

पुसला गावात मोठ्या प्रमाणावर या बियाण्याची लागवड

या गावातील शेतकऱ्यांबरोबरच परिसरातील पूसला या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या मिर्चीची लागवड करत असतात. परंतु या परिसरातही या मिर व्हायरस गेल्याने येथीलही शेकडो मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरकार व मिर्ची बियाणे कंपनीकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपती एकाच व्यासपीठावर असलेले पद्मालय तीर्थक्षेत्र! वाचा इतिहास...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.