अमरावती - कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या काळात मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक संघटना, धार्मिक संस्थाने मदत करत आहेत. याचप्रमाणे चौसाळा येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचाय व ग्राम कोरोना दक्षता समितीने नियमांचे पालन करून गावात फेरी काढून मदतीचे आवाहन केले. गावकऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देत एका तासात २१ हजार १११ रुपयांची मदत जमा केली. या मदतीत गावातील काळाराम मंदिर संस्थानने ५१ हजार रुपयाची भर घातली.
हा सर्व निधी तहसिलदार विश्वनाथ घुगे आणि पोटदुखे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी गुरूवारी सोपवण्यात आला. संस्थानने ६०० बॉटल सॅनिटायझर गावकऱ्यांकरता ग्राम पंचायतीच्या ताब्यात दिले. यावेळी सरपंच नंदा घासले, पोलीस पाटील शाम पाटील, काळाराम संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र लोळे यांच्यासह विश्वस्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते.