अमरावती - चांदूर रेल्वेवरून औरंगाबादला जाणाऱ्या एसटीला छत्रपती संभाजीनगरचे फलक मनसेने सोमवारी लावले. त्यामुळे नामकरणावरून चांदूर रेल्वेत मनसे आक्रमक झालेली पहावयास मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या २६ जानेवारी पर्यंत राज्य सरकारने औरंगाबाद चे 'छत्रपती संभाजीनगर' असे नामकरण करावे अशी मागणी केली आहे. राज्यभरातून मनसेच्या वतीने या मागणीला समर्थन दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या मागणीला आणखी बळ देण्याकरिता आज चांदूर रेल्वेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चांदूर रेल्वे बस स्थानक येथील चांदूर रेल्वे - औरंगाबाद बसचे बोर्ड काढून छत्रपती संभाजीनगर असे फलक लावले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जयघोष करण्यात आला.
यावेळी मनसे शहर अध्यक्ष वरदान इंगोले, शहर सचिव रितेश देशमुख, कार्याध्यक्ष दर्शन इंद्रावणे, ओमप्रकाश मानकर, हर्षल देशमुख, संदीप मेश्राम , मंगेश ठाकरे, दिनेश जगताप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रतीक सवाने, रोहित इंगोले, प्रसाद मेटे, अक्षय हटवार आदी उपस्थित होते.
अचलपूर मध्ये औरंगाबाद चे नामकरण संभाजी नगर करण्यासाठी मनसे आक्रमक -
संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या 26 जानेवारी पर्यंत राज्य सरकारने औरंगाबाद चे 'छत्रपती संभाजीनगर' असे नामकरण करावे अशी मागणी केली आहे. राज्यभरातून मनसेच्या वतीने या मागणीला समर्थन दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज या मागणीला पाठिंबा देण्याकरिता अचलपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परतवाडा बस स्थानक येथील चांदूर बाजार -औरंगाबाद बसचे बोर्ड काढून संभाजी नगर असे फलक लावले आणि छत्रपति संभाजी महाराज्यांच्या नावाने जयघोष करण्यात आला.