ETV Bharat / state

शिक्षकाकडून तीन विद्यार्थिनींचा लैगिंक छळ, तक्रारपेटीद्वारे प्रकार उघड

जिल्ह्यातील अवैध धंदे, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांसारखे प्रकार उघड व्हावे, यासाठी जानेवारीमध्ये पोलीस अधीक्षकांनी शाळा, महाविद्यालय, बस स्थानक आणि इतर महत्वाच्या ठिकाणी ३०० तक्रार पेट्या लावल्या आहेत. याद्वारे केलेल्या तक्रारीतून हा प्रकार उघड झाला आहे.

abuse
सांकेतिक छायाचित्र
author img

By

Published : Feb 29, 2020, 7:59 AM IST

अमरावती - विद्येचे दान देणाऱ्या शाळेतच एका नराधम शिक्षकाकडून तीन मुलींचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका शाळेत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय नागे याला अटक केली.

जिल्ह्यातील अवैध धंदे, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांसारखे प्रकार उघड व्हावे, यासाठी जानेवारीमध्ये पोलीस अधीक्षकांनी शाळा, महाविद्यालय, बस स्थानक आणि इतर महत्वाच्या ठिकाणी ३०० तक्रार पेट्या लावल्या आहेत. याद्वारे केलेल्या तक्रारीतून हा प्रकार उघड झाला आहे.

हेही वाचा - '....तर मुस्लीम आरक्षणालाच आमचा विरोध राहील'

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका गावातील शाळेत आरोपी शिक्षक संजय नागे कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तीन पीडित विद्यार्थीनींसोबत अश्लील वर्तन करत होता. विद्यार्थीनींनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला असता तो त्यांना मारहाणही करायचा. आरोपीच्या गैरवर्तवणुकीला कंटाळलेल्या या पीडितांनी याबाबतची तक्रार शाळेतील तक्रारपेटीद्वारे केली होती.

हेही वाचा - देशद्रोह खटला : 'कन्हैया कुमारने मानले केजरीवालांचे आभार', म्हणाला...'खरे काय ते जगालाही कळू द्या'

जिल्हाभरातील तक्रारपेट्या दुसऱ्यांदा उघडल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी महिला पोलिसांचे एक विशेष पथक तयार करून संबंधित शाळेच्या तपासणीसाठी पाठवले होते. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय नागेला अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.