ETV Bharat / state

अमरावतीत दुर्दैवी घटना: राखी बांधण्यापूर्वीच भावा-बहिणीचे बंध तुटले

author img

By

Published : Aug 15, 2019, 1:25 PM IST

Updated : Aug 15, 2019, 3:31 PM IST

अमरावतीत दुर्दैवी घटना घडली असून रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला भाऊ-बहिणीचा अपघात झाला. या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला आहे.

मृत तरुणी

अमरावती - रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील परतवाडा मार्गावरील जवर्डी फाट्याजवळ बुधवारी एका भरधाव ट्रॅव्हल्सने भाऊ-बहिणीला धडक दिली. या घटनेत बहिणीचा दुर्दैवी अंत झाला असून भाऊ जखमी झाला आहे.

रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस होय. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर घट्ट राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या भावावर टाकते. भाऊही आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. मात्र, याच रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला रस्ते अपघातात पल्लवी गणेश पाचपोर (१९, परतवाडा) या तरुणीचा मृत्यू झाला आहे.

पल्लवी ही अमरावतीच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गुरुवारी रक्षाबंधन असल्याने बुधवारी तिचा भाऊ तिला आणायला अमरावतीला गेला होता. चांगले शिक्षण घेऊन कुटुंबाचे नाव मोठे करायचे, हे स्वप्न उराशी बाळगणारी पल्लवी बुधवारी आपल्या लाडक्या भावासोबत आनंदात राख्या घेऊन रक्षाबंधनसाठी बांधण्यासाठी घरी येत होती. मात्र, वाटेतच अमरावती-परतवाडा मार्गावरील जवर्डी फाट्याजवळ बुधवारी एका भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली आणि यात तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिच्या भाऊही किरकोळ जखमी झाला आहे. रक्षाबंधन सणाला पल्लवी कायमचीच सोडून गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Intro:स्पेशल रिपोर्ट

दुर्दैवी:रक्षा बंधनच्या पूर्वसंध्येलाच बहीनीने घेतला जगाचा निरोप.

स्पेशल रिपोर्ट.

अँकर अमरावती 
रक्षाबंधन, बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस, बहीण आपल्या भावाच्या मनगटावर घट्ट राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या भावावर देतो भाऊही आपल्या बहिनीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो परंतु याच रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला भाऊ आणि बहिणीत कायमचीच ताटातूट झाली .पाहूया एक रिपोर्ट. 

Vo-1
फोटोत दिसणारि पल्लवी गणेश पाचपोर परतवाडा ही 19 वर्षाची तरुणी आज या जगात नाही .रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला .आज रक्षाबंधन असल्याने काल तिचा भाऊ तिला आणायला अमरावतीला गेला होता.पल्लवी ही अमरावतीच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. चांगलं शिक्षण घेऊन पारिवाराच ,भावच नाव मोठं करायचं हे स्वप्न उराशी बाळगणारी पल्लवी काल आपल्या लाडक्या भावासोबत आनंदात राख्या घेऊन रक्षाबंधन ला राखी बांधण्यासाठी घरी येत होती.परन्तु नियतीला काही वेगळेच मान्य असावे अशातच वाटेतच अमरावती परतवाडा मार्गावर असणार्‍या जवर्डि फाटा जवळ काल एका भरदाव ट्रॅव्हलस धडक दिली आणि तिची प्राणजोत मालवली.तर भावाला किरकोळ जखमा झाल्या.

बाईट-1-गावकरी

पल्लवी ही परिवारात लहान असल्याने ती सर्वांची लाडकी होती.सोबतच तिचा चांगला मनमिळाऊ स्वभाव यामुळे ती तिच्या घराच्या परिसरातीलही लोकांच्या लाडाची होती.परन्तु ती अशी अचानक निघून गेल्याने परिसरातील लोकांनी दुःख व्यक्त केलं आहे.

बाईट-2- गावकरी

माझा दादा मला उद्या न्यायला येतो, आई दादाला लवकर पाठवशी मी छान राख्या आणल्या ,दादा मी तुला आवडेल अशी राखी आणली अस म्हणणारी हक्काची बहीण ,आई वडिलांची लाडाची पल्लू ही रक्षाबंधन सारख्या पवित्र सणाला कायमचीच सोडून गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Aug 15, 2019, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.