अमरावती - जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची व प्रवाशांची जीवन वाहिनी व वऱ्हाडच वैभव म्हणून सुपरिचित असणारीं ब्रिटिश कालीन शकुंतला रेल्वे ( Shakuntala train turns 110 years old ) ही आता तब्बल 109 वर्षांची झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी चक्क 109 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. हल्ली आपण आपल्या नातेवाईक, मित्र,परिवारातील सदस्याचा केक कापून वाढदिवस साजरा करतो. त्याच धर्तीवर आपल्या लाडक्या रेल्वेचा देखील वाढदिवस तिच्या लाडक्या प्रवाशांनी ,आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान,शकुंतला बचाव कृती समितीच्या वतीने अचलपूर येथील रेल्वे स्टेशनवर साजरा करण्यात आला. यावेळी शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मितीतून रोजगार निर्मितीच्या ( Shakuntala train turns 110 years old ) दिशेने विचार करण्यात आला.
अचलपूर या नॅरोगेज रेल्वेमार्गावर 108 वर्षांपूर्वी 1 जानेवारी 1993 रोजी पहिली मालवाहू रेल्वे धावली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून ‘शकुंतला’चा 109 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला' रेल्वेला 109 वर्ष झाली. गेल्या तीन वर्षांपासून ही रेल्वे बंद पडली आहे. परंतु, ही रेल्वे सुरू राहण्यासाठी शकुंतला बचाव सत्याग्रहीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, ही रेल्वे आजही बंदच आहे
शकुंतलेची वैशिष्ट्ये
- सर्वसामान्यांसाठी अत्यल्प दराची हक्काची वाहतूक सेवा दिली.
- सुरुवातीला कोळशाचे इंजिन, नंतर डिझेल इंजिनचा वापर झाला.
- ताशी 27 किलोमीटर इतकी वेगमर्यादा, नंतर हा वेग ताशी 15 किलोमीटर इतका कमी झाला.
- मोळी विक्रेते, दूध विक्रेते, शेतमजूर यांच्यासाठी स्वस्त प्रवासाची सोय दिली.
- ज्या अंतराचे एसटीचे भाडे 100 रुपये आहे, त्या अंतरासाठी शकुंतलाचा दर 15 रुपये होता.
हेही वाचा - Vaccination in Nanded : मृत व्यक्तीला कोरोनाचा दुसरा डोस; आरोग्य विभागाचा अजब कारभार