अमरावती - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दुपारी तिवसा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात तहसील कार्यालयात समस्यांचा पाढा वाचण्यात आला.
हेही वाचा - ऐन दिवाळीच्या दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांची गैरसोय
पीएम आवास योजनेचे रखडलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावे, शेतकऱ्यांची वीज कापू नये, तिवसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी या आंदोलन कर्त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. तिवसा शहराचे आराग्य दैवत समर्थ सोटागीर महाराज यांच्या मंदिरापासून मोर्चाला सुरवात करण्यात आली, तर दोन किलोमीटर पायी चालत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी तिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांच्याशी आंदोलनकर्त्यांनी चर्चा करत मागण्याचे निवेदन दिले.
आंदोलनात माजी कृषी मंत्री व भाजप नेते अनिल बोंडे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष निलेश श्रीखंडे, शंतनू देशमुख, नरेंद्र राऊत, मिलींद देशमुख, योगेश बंड, सुरज वानखडे, ज्ञानेश्वर थोटे आदि उपस्थित होते.
हेही वाचा - हजारो क्विंटल संत्रा फेकल्या रस्त्यावर, शेतकरी झाला हतबल;ईटीव्ही भारत'कडून आढावा