ETV Bharat / state

Love Jihad Revealed: लव जिहादची दोन प्रकरणे उघडकीस आल्याचा भाजप नेत्याचा दावा - मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न

Love Jihad Revealed: लव जिहाद प्रकरणी पुन्हा एकदा 2 अल्पवयीन मुलींना फसवल्याचे उघडकीस आले आहे.

Love Jihad Revealed
Love Jihad Revealed
author img

By

Published : Nov 15, 2022, 10:13 AM IST

अमरावती: लव जिहाद प्रकरणी पुन्हा एकदा दोन अल्पवयीन मुलींना फसवण्याचे कारस्थान बडनेरा येथे उघडकीस आल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. भोळ्या भाबड्या, गरीब आणि निरागस मुलींना जाळ्यात ओढून त्यांची लव जिहाद प्रकरणी फसवणूक करणाऱ्या धेंडांना पोलिसांनी रंगेहात अटक केली व गुन्हा दाखल केला आहे. त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

हा प्रकार योजनाबद्ध: भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी म्हणाले, की अमरावती जिल्ह्यात लव जिहादच्याघटना उघडकीस आल्या आहेत. यासाठी आठवी, नववी व दहावीच्या कोवळ्या, निरागस व अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्याचे षडयंत्र आखले गेले आहे. या घटना सहज व स्वाभाविक नसून योजनाबद्ध रीतीने घडवून आणण्यात येत आहेत. काल दुपारी बडनेरा नव्या वस्तीत शिक्षक कॉलनीच्या बगिच्यात राजरोसपणे सुरू असलेल्या या धेंडांच्या दुष्कृत्याला कॉलनीतील लोकांनी आक्षेप घेतला.

मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न: अनेक तरुण जमा झाले आणि पोलिसांनी रंगेहात या धेंडांना ताब्यात घेतले. आपण लव जिहादचे बळी ठरत आहोत, याचा मागमूसही या दोन कोवळ्या मुलींना नव्हता. त्यांना कसे अडकवण्यात आले. त्यांना कसे ब्लॅक मेलिंग केले गेले, याची कथा दोन्ही मुलींनी पोलिसांकडे विशद केली आहे. या दोन प्रकरणावरून आणखी 3 अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार योजनाबद्ध असल्याचा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.

लव जिहादची दोन प्रकरणे उघडकीस

पालकांनी गाफील राहू नका: पालकांनी या प्रकरणी अजिबात गाफील राहू नये, असे कळकळीचे आवाहन देखील शिवराय कुळकर्णी यांनी केले आहे. हे प्रकरण घडताच शिवराय कुळकर्णी आणि भाजपासह हिंदुत्वावादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बडनेरा पोलीस ठाणे गाठले. दोन्ही निष्पाप मुलींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.