अमरावती - राज्यातील विद्युत विभागाची योजना चांगल्या प्रकारे आहे. तथापि, विद्युत विभागाचे कृषीपंपाचे विद्युत कनेक्शन सरसकट तोडण्याची चालू असलेली मोहीम तातडीने थांबवून शेतकऱ्यांना चालू बिल भरण्यासाठी १ जून २०२१ ही तारीख निश्चित करून दिलासा द्यावा, अशी मागणी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्र देऊन केली आहे.
काय लिहिले आहे पत्रात -
आपल्या पत्रात राज्यमंत्री कडू म्हणतात की, राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याचे विद्युत बिल हे एच. पी. पंपानुसार आकारले जाते. शेतकरी वर्षातून १ ते २ हंगामाच्यावेळी विद्युत वाहिनीचा वापर करतात. त्यांना सध्या दिलेले वीजबिल हे चुकीचे असून रद्द करुन त्याचा पुनर्विचार व्हावा. राज्यात पूर्णवेळ विद्युतवाहिनी वापरणारे शेतकरी दिवसाला ८ तास, महिन्याला एकूण ८ दिवस व वार्षिक ४ महिने वापर होतो. परंतु, विद्युत विभागाने वर्षभराचे एच.पी. नुसार आकारलेले ४० हजार रुपये बिल चुकीचे आहे. त्यामुळे याबाबतीत शासनाने योग्य तो निर्णय घेण्यात यावा. ते पुढे म्हणतात की, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे विद्युत बिल ग्रामपंचायत मार्फत भरल्यास शेतकऱ्यांना ३३ टक्के सवलत दिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल, असेही कडू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा - कराटे चॅम्पियन हेमंत नगराळे भावावरच करायचे प्रात्यक्षिके, कुटुंबीयांनी सांगितल्या आठवणी