ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - agitation in Amravati

शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी आशा सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. कोरोनाच्या कठीण काळात आम्ही जीवाची पर्वा न करता काम केले, कोरोनाबाधित व्यक्तींची सेवा केली. मात्र त्याबदल्यात आम्हाला दिवसाला केवळ 30 रुपये मिळाले, हा अन्याय आहे. आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन, महिना 22 हजार रुपये वेतन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

आशा कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

author img

By

Published : Jun 15, 2021, 8:27 PM IST

अमरावती - शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी आशा सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. कोरोनाच्या कठीण काळात आम्ही जीवाची पर्वा न करता काम केले, कोरोनाबाधित व्यक्तींची सेवा केली. मात्र त्याबदल्यात आम्हाला दिवसाला केवळ 30 रुपये मिळाले, हा अन्याय आहे. आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन, महिना 22 हजार रुपये वेतन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

आशा कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

काय आहेत मागण्या?

आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, सामाजिक सुरक्षा, पेन्शन, वैद्यकीय योजना लागू करण्यात याव्यात. यासह 45 व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गट प्रवर्तक यांना किमान 22 हजार रुपये वेतन लागू करावे. ग्रामपंचायतीच्या निधीतून आशा कर्मचाऱ्यांना 1 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. कोविड लसीकरण ड्युटी आशांना बंधनकारक नसताना त्यांना जबाबदारी देण्यात आली, आता त्यासाठी मानधनाची विशेष तरतूद करण्यात यावी. जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या चिरीडी प्रथमिक आरोग्य केंद्रातील आशा कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती, या प्रकरणाला तीन महिने उलटले तरी देखील अद्याप कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशा विविध मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत. वंदना बुरांडे, किरण रंगारी, विशाखा पाटील, मोनिका वानखडे, नलू इंगोले, स्मिता चेडे, प्रतिभा भेलये, सुनंदा गायकवाड, अस्मिता मोहोड यांच्यासह मोठ्या संख्येने आशा कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी? नारायण राणेंसह, अजून कोणाच्या नावाची चर्चा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.