ETV Bharat / state

विधानसभा अध्यक्षांना आर्टिकल १० चा विसर पडला, असदुद्दीन ओवेसी यांची टीका - असदुद्दीन ओवेसी

Asaduddin Owaisi : आमदार अपात्रतेबाबत निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संविधानातील आर्टिकल १० चा विसर पडला, अशी टीका 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची केली आहे. (Maharashtra Vidhan Sabha) महाराष्ट्राच्या राजकारणाला जनता पाहत आहे. (Rahul Narvekar) कसे हे लोक स्वतःचे कपडे काढून दुसरे कपडे घालत आहे. वेगवेगळ्या कलरचे कपडे घालत आहे, असेसुद्धा ते म्हणाले. (MIM President)

Maharashtra Vidhan Sabha
असदुद्दीन ओवेसी यांची टीका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 9:46 PM IST

असदुद्दीन ओवैसी यांची आमदार अपात्रतेच्या निकालावर प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Asaduddin Owaisi : आमदार अपात्रता सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत ठरवलं. (Article 10) मात्र, त्यावर एम.आय.एम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. अध्यक्षांचा निर्णय मला आश्चर्यकारक वाटला. मला असं वाटलं ते संविधानातील आर्टिकल 10 विसरून गेले, अशी टीका त्यांनी केली. तर महाराष्ट्राच्या राजकारणाला जनता पाहत आहे. कसे हे लोक स्वतःचे कपडे काढून दुसरे कपडे घालत आहे. वेगवेगळ्या कलरचे कपडे घालत आहे; मात्र आमचा एकच कलर आहे असं देखील ओवेसी यांनी सांगितलं.

इम्तियाज जलील यांनी ते करून दाखविलं: लोकसभा निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू आहे. येथील जनता पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना खासदार बनवतील. या अगोदरच्या खासदाराने काहीच केलं नव्हतं. मात्र इम्तियाज जलील यांनी काम करून दाखवलं. पाच वर्षांत दोन वर्षे कोविडमध्ये गेली. मात्र पुढील तीन वर्षांत त्यांनी जिल्ह्यासाठी चांगलं काम केलं. आदर्श बँकेचं प्रकरण त्यांनी हाती घेत सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा एकदा इम्तियाज जलील निवडून येतील असा विश्वास असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. खासदार जलील यांनी सुरू केलेल्या खासदार चषक स्पर्धांसाठी ओवेसी शहरात आले होते.

एमआयएम लोकसभा निवडणूक कोणासोबत लढणार? इंडिया आघाडीत जाण्याबाबत ओवेसी यांनी आपली भूमिका जाहीर केली. खासदार इम्तियाज जलील यांनी त्याबाबत प्रस्ताव दिला होता. राष्ट्रवादीसोबत जायचे की नाही हे खासदार इम्तियाज जलील सांगतील. ते त्यांनाच विचारा, लोकसभेत कोणासोबत जाणार यावर ओवेसी यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. तर राम मंदिर निर्माण करून पूर्ण झाले आहे. २२ जानेवारी रोजी पूजन होणार आहे. त्यावर बोलताना आमची एक भूमिका आहे आणि आम्ही ती बदललेली नाही. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहो. मला एकच सांगायचं आहे की, 6 डिसेंबर नसता तर काय झालं असतं असं उत्तर ओवेसी यांनी दिलं.

हेही वाचा:

  1. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम; सफाई कामगारच यशाचे खरे हिरो
  2. उद्धव ठाकरेंनी घरी बसून निबंध लिहावा, देवेंद्र फडणवीस यांची टीका
  3. राष्ट्रवादीचा देखील शिंदे गटाप्रमाणे प्रमाणे निकाल लागणार? वाचा शरद पवार गटाचे जयंत पाटील काय म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.