अमरावती - विधानसभेच्या सर्व आमदारांचा शपथविधी काल (बुधवारी) विधानभवनात पार पाडला. अमरावती जिल्हातील अचलपूर मतदारसंघाचे आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देशाच्या तिरंग्यास साक्ष ठेवून आपल्या आमदारकीची शपथ घेतली.
हेही वाचा- खासगीकरणाची प्रक्रिया अयशस्वी ठरली तर एअर इंडिया बंद होणार
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात विधानसभा अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतात. विधानसभा सभागृहात बच्चू कडू यांनी देशाच्या तिरंग्यास साक्ष ठेवून शपथ घेतली. तिरंग्यास साक्ष ठेवून शपथ घेणारे बच्चू कडू हे एकमेव आमदार आहेत. आमदार बच्चू कडू सलग चौथ्या वेळेस विजयी झाले आहेत. सर्वसामान्य जनता, अपंग व आरोग्यसेवेत त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. दरवेळी बच्चू कडू हे तिरंग्यास शपथ साक्ष ठेवून शपथ घेत असतात.