अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव बुद्रुक येथील एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या नावाने कोलकाता कोर्टाचा अटक वॉरंट निघाल्याने गावात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आपल्यावर कोणतेही कर्ज नसताना कर्ज फेडले नसल्याबाबत थेट कोलकत्याहून अटक वॉरंट निघाल्यामुळे शेतकर्यासह त्याचे कुटुंब चांगलेच हादरले आहे.
हेही वाचा - कला क्षेत्रात जातीवाद नकोच, पण यासाठी काही माणसं कार्यरत - विक्रम गोखले
दरम्यान, नितीन गावंडे घरी आल्यानंतर पोलीस कर्मचारी गुल्हाने यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात येण्याचे सांगितले. यानंतर गावंडे हे पोलीस ठाण्यात पोहचल्यावर त्यांना ॲक्सिस बँकेचे कर्ज भरले नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध थेट कोलकत्याहून अटक वॉरंट निघाला असल्याची माहिती मिळाली. आपल्यावर सध्या कोणत्याही बँकेचे किंवा व्यक्तीचे कर्ज थकीत नसून ॲक्सिस बँकेकडून घेतलेल कर्ज फेडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही आपल्याविरुद्ध अटक वॉरंट कसा निघाला असा सवाल नितीन गावंडे यांनी अंजनगाव सुर्जी येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेकडे केला. या प्रकरणाची शहानिशा केल्यावर बँकेच्या व्यवस्थापकांनी बँकेच्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.
नितीन गावडे यांच्यावर कुठलेही कर्ज थकीत नसल्याचे ॲक्सिस बँकेने स्पष्ट केल्यावर कोलकाता न्यायालयाने जारी केलेला वॉरंट रद्द करण्यासाठी त्यांनी कोलकात्याला जावे असा सल्ला बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, कोणताही गुन्हा नसताना कोलकात्याला का जावे असा प्रश्न गावंडे यांनी उपस्थित केला आहे. प्रकरणी गावंडे कुटुंबीयांनी अमरावती गाठून जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांना निवेदन सादर करून आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली आहे.
हेही वाचा - 'अजितदादांमुळे दुसऱ्याचे सोपे पुस्तक वाचायची गरज नाही'