अमरावती- दूषित पाणी पिल्याने अतिसारची लागण होऊन तीन आदिवासींचा मृत्यू झाल्याची ( diarrhea death in Amrvati ) घटना घडली होती. अशातच वेळेवर उपचार न मिळाल्याने मेळघाटातील चुनखडी येथील आदिवासींचा ( Melghat tribals deaths ) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुदाम बुढा कासदेकर ( Sudam Budha Kasdekar ) असे मृत ग्रामस्थाचे नाव आहे.
सुदाम बुडा कासदेकर हे पिकाच्या संरक्षणासाठी शेतात मुक्कामी असताना त्यांना अचानक रात्रीला खूप ताप आला. उपचारासाठी कुटुंबियांनी त्यांना रात्रीच गावातील आरोग्य उपकेंद्रात घेऊन गेले. परंतु त्या ठिकाणी कोणताही आरोग्य कर्मचारी, डॉक्टर व परिचर उपस्थित नव्हते. आरोग्य केंद्राला कुलूप असल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकला नाही. या संदर्भात त्यांनी काटकुंभ, चुरणी येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क ( Upazila Hospital of Katkumbh ) साधला असता तेथील डॉक्टरांनी तत्काळ रुग्णवाहिका पाठवून रुग्णांला दवाखान्यात येण्यास मदत केली. परंतु दुर्दैवाने मेळघाटातील रस्ते खराब असल्याने ( Melghat road issues ) रुग्णाला वेळेवर पोहोचता आले नाही. त्यांचा उपचारविना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला.
आरोग्य विभागावर रोष व्यक्त - गावातील उपकेंद्र सुरू असते तर सुदाम कासदेकर यांचा जीव वाचला असता. गावातील उपआरोग्य केंद्र बंद असल्याने उपचारा करिता गेलेल्या शेतकऱ्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. सुदाम कासदेकर यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आहे. आरोग्य विभागावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित वरिष्ठ आरोग्य विभागाने चुनखडी येथील कर्मचारी ड्युटीवर हजर नसल्याचे माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी आदिवासी जनतेकडून करण्यात येत आहे.
रुग्णांचे वाढते प्रमाण, जलजन्य आजाराचा उद्रेक- चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये ताप, थंडी, पोटदुखी , उलट्या यांसह विविध आजाराने कहर केला आहे.
काही दिवसांपूर्वी पाचडोंगरी येथे तीन लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. कोयलारी गावात अतिसार, उलट्या, जुलाब होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. परंतु तरीही अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडतात हा खरा प्रश्न आहे. कासदेकर यांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अपयशी झाल्याचा अनुभव आल्याचे दिसत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे अशा सूचना असतांना सुद्धा कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. आणखी किती जणांचा जीव घेण्याची वाट पाहता, असा सूर मेळघाटातील आदिवासींकडून उमटत आहे.
हेही वाचा-दूषित पाणी बाधा प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना ‘प्रहार’कडून एक लाखाची मदत