ETV Bharat / state

Farmer Destroys Orange Orchard : पोटच्या लेकराप्रमाणे १४ वर्ष ६५० संत्र्याची झाडं जगवली, आता दुर्दैवाने तोडण्याची वेळ आली; अमरावतीत शेतकऱ्याला अश्रू अनावर

सातत्याने संत्र्याची होणारी गळती, ढासळलेले बाजारभाव, सरकारचे चुकीचे धोरण यापुढे हतबल झालेल्या मोर्शी तालुक्यातील (Morshi Tahsil) संत्रा उत्पादक शेतकरी (Orange Grower) राजेंद्र जगाते यांनी आपली संत्र्याची ६०० झाडांची हिरवीगार बाग तोडायला सुरवात केली (Farmer Destroys Orange Orchard) आहे. पोटच्या लेकराप्रमाणे जगवलेली झाडे तोडण्याची वेळ आल्याने राजेंद्र यांना अश्रू अनावर झाले.

संत्रा उत्पादक शेतकरी
संत्रा उत्पादक शेतकरी
author img

By

Published : Dec 10, 2021, 11:24 AM IST

अमरावती : एक दोन नव्हे तर तबल १४ वर्ष रात्रीचा दिवस करून पोटच्या लेकराप्रमाणे ६५० संत्राची झाड जगवली. लोकांकडून कर्ज घेतलं. रक्ताचं पाणी करून अफाट कस्ट व मेहनत घेत खडतर मार्गातून अप्पर वर्धा धरणातून (Upper Wardha Dam) संत्रा बागेसाठी पाणी आणलं. यंदा नाही तर पुढच्या वर्षी संत्रा पिकातून बरकत होत, घरात समृद्धी येईन ही आशा होती. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे त्या शेतकऱ्याचे कष्ट ही थांबले. सातत्याने संत्राची होणारी गळती, ढासळलेले बाजारभाव, सरकारचे चुकीचे धोरण यापुढे हतबल झालेल्या मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी राजेंद्र जगाते यांनी आपली संत्राची ६०० झाडांची हिरवीगार बाग तोडायला सुरवात केली. दोन वर्षापूर्वी २०० झाडे तोडल्यानंतर आता उर्वरित ४५० झाडांवर त्यांनी जेसीबी चालवायला सुरवात केली. पोटच्या लेकराप्रमाणे १४ जगवलेली बाग डोळ्यादेखत उध्वस्त होत असल्याने राजेन्द्र जगाते यांना अश्रू अनावर झाले आहेत.

विदर्भाचा कॅलोफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी (Morshi Tahsil In Amaravati) तालुक्याची ओळख आहे. नागपूरसोबतच अमरावतीमधील संत्र्याला (Amaravati Orange) संपूर्ण जगात मागणी असते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील संत्रा उत्पादक डबघाईला आला असून, संत्र्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पर्यायाने संत्रा उत्पादनाला लागलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला संत्रा रस्त्यावर फेकून देण्याची तसेच हिरवीगार संत्रा झाडे तोडण्याची वेळ संत्रा उत्पादकांवर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील येरला या गावात राजेंद्र बाबाराव जगाते या युवा शेतकऱ्यांकडे ४ एकर शेतीमध्ये संत्रा पीक आहे. संत्राच्या गोड रसाप्रमाने या शेतकऱ्यांने संत्राच्या भरवशावर गोड स्वप्न पाहली होती. पण ती धुळीस मिळाली आहेत. ऐन सिझनात होणारी संत्रा गळती, संत्र्याच्या दरात होणारी घसरण, विजेचा अनियमितपणा व पाण्याची टंचाई यासारख्या अनेक कारणांमुळे या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतातील 14 वर्षांची असलेली हिरवीगार संत्रा झाडी तोडण्याास सुरुवात केली आहे.

पोटच्या लेकराप्रमाणे जगवलेली झाडे तोडण्याची वेळ आल्याने राजेंद्र यांना अश्रू अनावर झाले.
सुरुवातीला या शेतकऱ्याकडे ६५० संत्रा झाडे होती. परंतु लावलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने या शेतकऱ्यांने २०० झाडे मागील वर्षी तोडली होती. मागील ३ ते ४ र्षांपासून या संत्र्यापासून उत्पन्न मिळत नसल्याने उर्वरीत ४५० झाडे जेसीबीच्या सहाय्याने बुडासकट तोडणे सुरू केले आहे. संत्रा जगवताना या शेतकऱ्यांने शेतापासून दूर असलेल्या अप्पर वर्धा धरणातून पाणी सुद्धा आणले. परंतु वीज नसल्याने पाणी देताना अडचण निर्माण व्हायची. त्याकारणाने त्याने जनरेटर सुद्धा विकत घेत ही संत्रा झाडे जगवली. आपल्याला दोन पैसे जास्त मिळतील या उद्देशाने दिवस रात्र मेहनत करून १४ वर्षे या झाडाची जोपासना केली. परंतु मागील ३ ते ४ वर्षांपासून संत्राला भाव मिळत नसल्याने व संत्रा गळती मोठ्या प्रमाणात असल्याने या शेतकऱ्याने शेतातील संत्रा झाडे तोडण्याचा निर्णय घेत शेतातील हिरवीगार संत्रा झाडे तोडली. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर अशाच प्रकारची गदा आल्यास मोर्शी तालुक्यातील आणखी काही शेतकरी संत्रा झाडे तोडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.