ETV Bharat / state

अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री - kadambari chaudhari snake friend

अमरावतीमध्ये कादंबरी चौधरी नावाची सर्पमित्र तरुणी राहते. साप हा आपला मित्र असून, सापाला मारू नका अशा प्रकारचे साप संवर्धन कार्यक्रम करुन ती लोकांमध्ये जागृती करत आहे.

kadambari-chaudhari
सर्पमित्र कादंबरी चौधरी
author img

By

Published : Jan 21, 2020, 10:45 AM IST

Updated : Jan 22, 2020, 9:50 AM IST

अमरावती - साप हा शब्द जर कानावर पडला तर भिती वाटल्याशिवाय राहत नाही. जिथे साप पकडायला भलेभले घाबरतात तिथे मात्र एक तरुणी चक्क सहजपणे सापांना पकडून त्या सापांशी मैत्री करत आहे. आतापर्यंत फक्त पुरूष सर्पमित्र आपण ऐकिवात असू मात्र, इथे चक्क एक तरुणी नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस असे विषारी आणि बिनविषारी दोन्ही प्रकरचे साप पकडते व त्यांना जंगलात सोडते.

अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री

हेही वाचा - वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी घातला ट्रॅक्टर; पाच जणांना अटक

अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये कादंबरी प्रदीप चौधरी ही सर्पमित्र तरुणी राहते. साप हा आपला मित्र आहे सापाला मारू नका त्याच्याशी मैत्री करा व पर्यावरण टिकवा असे ती सर्वांना सांगत आहे. कादंबरी ही उच्चशिक्षित असून, इंजिनिअरिंग क्षेत्रात तिने एमटेक केले आहे. सध्या ती एल. एल. बी. करित आहे. टीव्हीवर दिसणाऱ्या डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी आदी वाहिन्या पाहून, तिला हा लहानपणापासूनच छंद जडलेला आहे. पशुपक्षी संवर्धनासाठी ती 'सेव अँड सेफ अॅनिमल' नावाची संस्था चालवते. आतापर्यंत तिने 20 पेक्षा अधिक सापांना जीवदान दिले आहे.
कादंबरी फक्त सापांना जीवदान देत नाही तर ठिकठिकाणी जावून आपले प्रेजेंटशन सादर करुन 'साप संवर्धन जनजागृती' कार्यक्रम सादर करते.

हेही वाचा - अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळामध्ये भ्रष्टाचार झाला.. रोहित पवारांची चौकशीची मागणी

Intro:अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री.

स्पेशल पॅकेज स्टोरी करावी.

अमरावती अँकर 
साप हा शब्द जरी कानावर पडला तर आपल्या पायाखालची जमीन सरकल्या शिवाय राहत नाही. जिथे साप पकडायला भलेभले घाबरतात तिथे मात्र एक तरुणी चक्क सहजपणे सापांना पकडून त्या सापांची मैत्री करते व त्यांना सहजपणे जंगलात सोडून देते  हे ऐकायला जरा आश्चर्यकित वाटेल पण हे खर आहे .एक मुलगी चक्क सापांना जीवदान देण्यासाठी सर्पमित्र झाली आहे कोण आहे ही तरुणी पाहूया etv भारताच्या या स्पेशल रिपोर्ट च्या माध्यमातून.

Vo-1
उभी असलेली ही तरुणी बघा तिच्या दोन्ही हातावर सरपटणारा हा भला मोठा साप आणि या जीवघेण्या सापांशी मैत्री करणारी आहे. अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील राहणारी कादंबरी प्रदीप चौधरी .साप हा आपला मित्र आहे सापाला मारू नका त्याच्याशी मैत्री करा पर्यावरण टिकवा यासाठी तीची सध्या धडपड सुरू आहे.सर्पमित्र तरुणच असतात हा अविर्भाव तिने मोडीत काढत ती सर्पमित्र म्हणून सापांना जीवदान देते.

बाईट-1- कादंबरी चौधरी 

Vo-2
कादंबरी ही उच्चशिक्षित असून इंजिनिअरिंग क्षेत्रात तिने एमटेक केले आहे. सध्या ती एल एल बी करीत आहे. टीव्हीवर दिसणाऱ्या डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी, आदि चैनल पाहून तिला हा लहानपणापासूनच छंद जडलेला आहे. पशुपक्षी संवर्धनासाठी ती SAVE and SAFE ANIMAL नावाची संस्था ही चालवते. आता पर्यत तिने  20 पेक्षा अधिक सापांना जीवदान दिले.तर मोठमोठ्या विषारी सापाना सहज हाताळले.

बाईट-2-कादंबरी चौधरी

Vo-3
तिच्या या जीवघेण्या छंदाला मात्र तिच्या घरच्यांनी सुरवातीला विरोध केला परंतु आज तिचे घरचेही तिच्या कामाला  प्रोत्साहन देतात.

बाईट-3-प्रदीप चौधरी- कादंबरीचे वडील
बाईट-4-संगीता चौधरी-कादंबरी ची आई

Vo-4
सापाविषयी मुलीच्या मनात असलेली भीती मागे सारून मुलींनी सुद्धा या उपक्रमात सहभाग घ्यावा असे मत कादंबरी ने व्यक्त केले आहे.

बाईट-5-कादंबरी चौधरी

Vo-5
कादंबरी फक्त सापाना फक्त जीवदानच नाही तर ठिकठिकाणी आपला लँपटाँप घेऊन प्रोजेक्टर वर  Snake Awareness Program  करूण सापांबददल लोकांच्या मनात असलेली भीती नष्ट करण्यासाठी मोठे काम करते आहे. या आगळ्यावेगळ्या समाजकार्यासाठी तीला सर्व तिकडे शुभेच्छा दिल्या जात आहे. एक मुलगी ही आपला बचाव व जनतेचे सुद्धा बचाव करू शकते हे यातून लक्षात येत आहे.

स्वप्निल उमप
ETv भारत अमरावती

स्वप्निल उमप
ETV भारत अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jan 22, 2020, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.