अमरावती - भव्य मोर्चा निघाला की, त्यातील क्षणचित्रे टिपण्यासाठी ते कधी विजेच्या खांबावर चढायचे, कधी एखाद्या झाडाच्या फांदीवर उभे राहायचे तर कधी मोठ्या इमारतीच्या छतावरून छायाचित्र काढायचे.आपल्या कॅमेऱ्यातून छायाचित्र कसे चांगले येईल याची सारी ही धडपड.. कुठे कधी मारामारी सुरू असताना, गंभीर अपघाताचे प्रसंग यासोबतच निसर्गातील विविध रंगछटा टिपून वृत्तपत्राद्वारे अनेकांसमोर सादर करून आपल्या कलेसह नावाचा ठसा उमटवणाऱ्या अमरावती शहरातील तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांवर अचानक बेरोजगरीचे संकट ओढवले आणि त्यांचा पोटा-पाण्यासाठीचा मार्गच बदलला. शशांक नागरे, मनीष जगताप आणि शेखर जोशी असे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली नावे. आज मात्र तिघांनी कॅमेरा थोडा बाजूला ठेऊन प्रत्येकाने स्वतंत्र असा व्यवसाय थाटला आहे. आजपर्यंत इतरांसाठी काम केलं आता मात्र स्वतःच्या व्यवसायात भविष्याची समृद्धी दिसते आहे. हे सगळं उशिरा कळलं असलं तरी आपण आता याच मार्गाने पुढे जायचं, यशस्वी व्हायचं असे तिघेही म्हणतात.
नोकरी गमावल्यावर 'त्यांना' स्वयं-रोजगारातून गवसला समृद्धीचा मार्ग; तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांची कहाणी - नोकरी सोडून व्यवसाय कसा करावा
अमरावती शहरातील तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांवर अचानक बेरोजगारीचे संकट ओढवले आणि त्यांचा पोटा-पाण्यासाठीचा मार्गच बदलला. शशांक नागरे, मनीष जगताप आणि शेखर जोशी असे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली नावे. आज मात्र तिघांनी कॅमेरा थोडा बाजूला ठेऊन प्रत्येकाने स्वतंत्र असा व्यवसाय थाटला आहे.