ETV Bharat / state

Amravati Student Amazing Idea : जंगली श्वापदांना पिटाळून लावण्यासाठी विद्यार्थ्याची भन्नाट आयडिया; कृषी मालाचे थांबणार नुकसान, वाचा सविस्तर - विद्यार्थ्याची भन्नाट आयडिया

जंगली श्वापदांपासून कृषी मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या नुकसानीला आळा घालता यावा यासाठी अमरावतीच्या एका विद्यार्थ्याने त्याच्या सर्जनशील कल्पकतेमुळे एक प्रयोग केला आहे. जंगली प्राण्यांना कुठलीही इजा न होता ते प्राणी या प्रयोगातून तयार केलेल्या उपकरणाच्या होणाऱ्या आवाजामुळे दूर जातील. अमरावतीतील न्यू हनुमान नगर येथील अथर्व विराग गावंडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

Amravati Student Amazing Idea
विद्यार्थी अथर्व गावंडे उपकरणाबद्दल माहिती देताना
author img

By

Published : Feb 5, 2023, 7:32 PM IST

Updated : Feb 5, 2023, 8:07 PM IST

विद्यार्थी अथर्व गावंडे उपकरणाबद्दल माहिती देताना

अमरावती : जंगली श्वापदांपासून कृषी मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानीला आळा घालता यावा यासाठी अमरावतीच्या एका विद्यार्थ्याने एक भन्नाट आयडिया केली आहे. या भन्नाट आयडीयाच्या माध्यमातून या जंगली श्वापदांना पिटाळून लावताना कुठल्याही कुठल्याच प्रकारची शारीरिक ईजा न पोहोचवता त्यांना पिटाळून लावता येणे शक्य असल्याचे या विद्यार्थ्याने सांगितले आहे. या विद्यार्थ्यांने नुकतेच या प्रयोगाचे सादरीकरण आपल्या शाळेत सादर केले. या विद्यार्थ्याचे नाव अथर्व विराग गावंडे असे आहे. तो अमरावतीमधील न्यू हनुमान नगर परिसरात राहतो.

यामुळे सूचली संकल्पना : अथर्व विराग गावंडे हा विद्यार्थी शहरातील गणेशदास राठी या विद्यालयात इयत्ता नववी शिकतो. शाळेमध्ये आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये आपण काहीतरी वेगळे करावे, असे त्याने मनोमन ठाणले. वेगळे काय करावे हे त्याला सुचत नव्हते. अथर्वचे आजोबा हे शेतकरी असून जंगली श्वापदापासून कृषीमालांना तसेच शेतीला मोठ्या प्रमाणात त्रास असल्याचे त्याच्या आजोबांनी त्याला सांगितले आणि अथर्वच्या डोक्यात एक लख्ख प्रकाशच पडला.

उपकरणाची केली निर्मीती : जंगली प्राण्यांना शारीरिक इजा न पोचता त्यांना पिटाळून लावण्यासाठी आपण एखादे उपकरण बनवावे, असे त्याच्या मनात आले. जंगली प्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे त्याला समजले. शेतकऱ्यांना वरदान ठरेल, असे उपकरण बनवले तर या उद्देशाने त्याने उपकरण बनवण्यासाठी इंटरनेटवर शोध सुरू केला. अशातच त्याला एका युट्युबवरने अगदी कमी साहित्यामध्ये अशा प्रकारचे एक उपकरण तयार केल्याचे आढळले. परंतु त्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी अथर्वने दूर करत सुधारित उपकरण तयार केले.

अशी केली साहित्याची जमवाजमव : या उपकरणासंदर्भात त्याने आपल्या आई सोबत चर्चा केली आणि लगेच होकार देत साहित्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली. या उपकरणासाठी लागणाऱ्या शीतपेयाच्या रिकामा बाटल्या आपल्याकडे नाही हे अथर्वच्या आईच्या लक्षात आले. लगेच त्यांनी एका भंगारवाल्याशी संपर्क केला आणि त्या भंगारवाल्यांनी त्या रिकाम्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर त्यासाठी लागणारा गॅस अथर्व ने एका ई-कॉमर्स कंपनीच्या पोर्टलवरून ऑर्डर करून मागवला.

विज्ञान प्रदर्शनात केला सादर प्रयोग : नुकत्याच अथर्वच्या शाळेत झालेल्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये त्याने हा प्रयोग सादर केला आणि या प्रयोगाच्या सादरीकरणानंतर एकच टाळ्या पडल्या लगेचच अमरावती येथील उर्दू सैफी शाळा या शाळेत आयोजित तालुका स्तरीय प्रदर्शनी मध्ये त्याने हा प्रयोग सादर केला येथे सुद्धा त्याचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी भरभरून कौतुक केले.

उपकरणासाठी घेतली मेहनत : अथर्वला अभ्यासाव्यतिरिक्त नवनवीन गोष्टीमध्ये संशोधन करण्यात तसेच त्यामध्ये नवनवीन उपकरणे तयार करण्यामध्ये विशेष आवड असल्याचे त्याची आई वनिता यांनी सांगितले. यापूर्वीसुद्धा त्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पामध्ये विशेष मेहनत घेतल्याचे अथर्वची आई वनिता यांनी सांगितले.

अमेरिकेतून सातत्याने मार्गदर्शन : अथर्वचे मामा योगेश हे अमेरिकेमध्ये स्थायिक असून ते कम्प्युटर इंजिनियर आहेत. तेथे ते एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतात. तर मामी या रसायनशास्त्र या विषयामध्ये बॉस्टन विद्यापीठातून संशोधन करत आहे. अथर्वचा त्याचा मामा आणि मामीशी सातत्याने संवाद होत असतो. ते अथर्वला नेहमी संशोधक वृत्तीने मार्गदर्शन करत असल्याचे अथर्वने सांगितले.

हेही वाचा : Army Parachute Emergency Landing: श्रीगंगानगरमध्ये लष्कराच्या पॅराशूटचे इमर्जन्सी लँडिंग, हवेत उड्डाण केले अन् गॅस संपला

Last Updated : Feb 5, 2023, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.