ETV Bharat / state

अमरावती-मुंबई एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या चौदा दिवसांसाठी राहणार बंद - अमरावती-मुंबई एक्सप्रेस रेल्वे गाडी बंद

रेल्वे प्रशासनाने विदर्भातून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये नेहमी हाऊसफुल्ल धावणारी अमरावती-मुंबई एक्सप्रेससह अमरावती-सुरत एक्सप्रेस तसेच अमरावती-पुणे एक्सप्रेस या गाड्या सुद्धा ११ मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

अमरावती
अमरावती
author img

By

Published : Apr 27, 2021, 3:11 PM IST

अमरावती - कोरोनाने सध्या राज्यात कहर केला आहे. त्यामुळे सध्या 1 मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मुबंईत देखील कोरोनाचा कहर असल्याने विदर्भातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही अर्ध्यावर आली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने विदर्भातून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये नेहमी हाऊसफुल्ल धावणारी अमरावती-मुंबई एक्सप्रेससह अमरावती-सुरत एक्सप्रेस तसेच अमरावती-पुणे एक्सप्रेस या गाड्या सुद्धा ११ मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे स्थानकावरून घेतलेला आढावा

त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला ये-जा करणाऱ्यांना आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. पश्चिम विदर्भात रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला उतरलेली अमरावती-मुंबई एक्सप्रेस मागील काही दिवसांपासून अर्ध्यापेक्षा जास्त कमी प्रवासी घेऊन धावत आहे. त्यामुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने चौदा दिवस या रेल्वेला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने ज्या लोकांनी आरक्षण केले आहे, त्या लोकांना पैसे परत मिळणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.