ETV Bharat / state

बडनेरा प्रकरण : जिल्ह्याच्या खासदार आणि पालकमंत्री महिला असताना अशा घटना संतापजनक - नवनीत राणा

बडनेरा येथील कोरोना चाचणी केंद्रामध्ये घडलेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. ज्या जिल्ह्यात महिला खासदार आहे, ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीदेखील महिला आहेत आणि देशाला पहिल्या महिला राष्ट्रपतीही ज्या जिल्ह्याने दिल्या आहेत अशा ठिकाणी हा प्रकार घडणे नक्कीच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली.

author img

By

Published : Jul 30, 2020, 8:15 PM IST

Amravati MP Navneet Rana reacts on Badnera swab test incident
बडनेरा प्रकरण : जिल्ह्याच्या खासदार आणि पालकमंत्री महिला असताना अशा घटना संतापजनक - नवनीत राणा

अमरावती : बडनेरा येथील कोरोना चाचणी केंद्रामध्ये घडलेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. ज्या जिल्ह्यात महिला खासदार आहे, ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीदेखील महिला आहेत आणि देशाला पहिल्या महिला राष्ट्रपतीही ज्या जिल्ह्याने दिल्या आहेत अशा ठिकाणी हा प्रकार घडणे नक्कीच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली.

अमरावतीमध्ये मॉलमध्ये काम करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला होता. मॉलमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्यामुळे, त्या व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्या 20 कर्मचाऱ्यांची बडनेरा येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले. मात्र, तरीही प्रयोगशाळेतील टेक्निशियन अल्पेशने तरुणीला बोलवून तुझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून लघवीची तपासणी करावी लागेल, असे संगितले. आमच्याकडे या तपासणीसाठी महिला कर्मचारी नाही. तू कोणत्याही महिलेला सोबत आणले तरी हरकत नाही, असे अल्पेशने त्या तरुणीला सांगितले.

ही तरुणी तपासणीसाठी आली असता अल्पेशने तिला एका खोलीत नेऊन तिच्या गुप्तांगाची तपासणी केली आणि अवघ्या 5 मिनिटात अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले. या सर्व प्रकाराबाबत तरुणीला शंका वाटल्याने तिने घडलेला सर्व प्रकार भावाला सांगितला. यानंतर अल्पेशने तरुणीच्या मोबाईलवर संदेशही पाठवला. या गंभीर प्रकाराबाबत तरुणीने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बडनेरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली.

दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. खासदार नवनीत राणा यांनी या प्रकाराबाबत संतप्त भावना व्यक्त करत पीडित महिलेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे म्हटले आहे. हा युवक कंत्राटी पद्धतीने कोविड सेंटरमध्ये काम करीत होता. त्याची कुठलीही माहिती न घेता महापालिका प्रशासनाने त्याला कामावर घेतले होते. एखाद्या व्यक्तीची माहिती न घेता त्याला कामावर ठेवणे ही मोठी चूक आहे. त्याचा इतिहास तपासणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महिलांनी सक्षम व्हायला हवे अशी प्रतिक्रिया या प्रकाराबाबत दिली. त्याबाबतही नवनीत राणा यांनी खेद व्यक्त केला आहे. महिलांना सक्षम होण्याचा सल्ला देऊन आपण मोकळे होऊ शकत नाही. प्रशासनाच्या चुका झाकण्याचा प्रकार व्हायला नको. कोरोनाच्या काळात अमरावतीत सर्व गोंधळ उडतो आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, तसेच जिल्ह्यात हव्या तशा चाचण्या घेतल्या जात नाहीत, असेही त्या म्हणल्या.

हेही वाचा : बडनेरातील 'त्या' कोविड सेंटरवर जमावाचा हल्ला, साहित्याची तोडफोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.