अमरावती - विदर्भातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरी म्हणून ओळख असणारे अमरावती शहर हे विदर्भाच्या इतर शहरांच्या तुलनेत शांत शहर (peaceful city Amaravati) म्हणून ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी शहरातील शांततेला गालबोट लागले. त्यावर समाजातील समाज अभ्यासक आणि साहित्यिकांनी अमरावती म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) , कर्मयोगी संत गाडगे महाराज (Sant Gadgebaba Maharaj) यांची ही भूमी असल्याचे आठवून करून दिली आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि समाज अभ्यासक अविनाश दुधे (Journalist Avinash Dudhe on Amravati violence) हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की त्रिपुरा येथे एका धार्मिक स्थळावर हल्ला झाल्याच्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊन अमरावतीत एका समुदायाच्या लोकांनी शुक्रवारी मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या काही लोकांनी बाजारपेठेत दगडफेक केली. हा प्रकार माहिती होताच इंटरनेटवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्रिपुरात असा काही प्रकार घडलाच नसल्याचे लक्षात आले. वास्तवात अफवेर विश्वास ठेऊन लोकांना मोर्चा काढायला सांगणाऱ्यांनी खरी माहिती समजून घेऊन आपल्या लोकांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. यामुळे विनाकारण मोर्चा निघाला. त्यानंतर शहरात दगडफेक झाली. शुक्रवारी जे घडले त्याची प्रतिक्रिया शनिवारी दुसऱ्या समुदायाकडून उमटली. यामागे कोणतेही राजकाण होते, असे वाटत नसल्याचे अविनाश दुधे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-डॉक्टर वडिलांचे कोरोनामुळे निधन झालं, मुुलीने मांडली कुटुंबाची व्यथा; ईटीव्ही भारत'चा आढावा
कोण चुकले, कोण बरोबर ही चर्चाच नको-
साहित्यिक आणि चित्रकार सुनील यावलीकर (Artist Sunil Yavalikar on Amravati violence ) ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की अमरावती ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची केवळ जन्मभूमीच नव्हे तर कर्मभूमीही आहे. या सर्व थोर व्यक्तींनी दिलेला मानवता धर्माचा संदेश या मातीत रुजला आहे. असे असताना जी काही घटना घडली ती धक्कादायक आहे. यात आता चुकले कोण आणि बरोबर ही चर्चाच नको. कोरोनाच्या महासंकटातून आताच आपण सावरायला लागलो आहे. नव्या पिढीसमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले (corona create challenges for new generation) आहे. कोरोनामुळे अनेक नवी आव्हाने समोर असताना अशा स्वरुपाच्या घटनेमध्ये समाज भरकटणे योग्य नाही. मानवतेला अशी गालबोट लावणारी घटना घडल्याने कुठलाही संवेदनशील माणूस खचून जातो. एका समाजाने आज केले म्हणून त्याला तसे उत्तर देणे हे योग्य नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे, कोणी आपला एक डोळा फोडला तर आपण त्याचा दुसरा डोळा फोडणार... असे एकमेकांचे डोळे पडत राहिले तर संपूर्ण समाज आंधळा होईल. आपल्याला समाज आंधळा नको, असेही सुनील यावलीकर म्हणाले.
हेही वाचा-Amravati Violence : संजय राऊतांनी अमरावती हिंसाचाराबद्दल बोलू नये - नवनीत राणा