ETV Bharat / state

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मंत्री, आमदारांमध्ये चुरस; मंत्री यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू उतरणार रिंगणात - bank election in amravti

जिल्हा मध्यवर्ती बँकेची यापूर्वीची निवडणूक सन २०१० मध्ये झाली होती. त्यावेळी बबलू देशमुख व संजय खोडके असे दोन गट निवडणूक मैदानात होते. त्यावेळी बबलू देशमुख गटाच्या २५ पैकी १३ जागा निवडून आल्याने बँकेवर त्यांनी सत्ता प्रस्तापित केली. सन २०१५ मध्ये पंचवार्षीक निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु राजकीय व्देष व अन्य कारणांमुळे तब्बल पाच वर्ष बँकेतील विविध प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने सन २०१० पासून निवडणूकच झाली नाही.

बच्चू कडू उतरणार रिंगणात
बच्चू कडू उतरणार रिंगणात
author img

By

Published : Sep 4, 2021, 9:57 AM IST

अमरावती - अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 4 ऑक्टोबरला निवडणुक पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले असून महाविकास आघाडी मधील दोन मंत्री या निवडणुकीत आमने-सामने येणार आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. आज राजमंत्री बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडकेही यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मंत्री, आमदारांमध्ये चुरस

जिल्हा मध्यवर्ती बँकेची यापूर्वीची निवडणूक सन २०१० मध्ये झाली होती. त्यावेळी बबलू देशमुख व संजय खोडके असे दोन गट निवडणूक मैदानात होते. त्यावेळी बबलू देशमुख गटाच्या २५ पैकी १३ जागा निवडून आल्याने बँकेवर त्यांनी सत्ता प्रस्तापित केली. सन २०१५ मध्ये पंचवार्षीक निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु राजकीय व्देष व अन्य कारणांमुळे तब्बल पाच वर्ष बँकेतील विविध प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने सन २०१० पासून निवडणूकच झाली नाही. त्यामुळे तब्बल ११ वर्ष बँकेवर बबलू देशमुख गटाचे वर्चस्व होते

अशी होणार लढत

पहिला गट - पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, प्रमोद कोरडे
दुसरा गट - राज्यमंत्री बच्चू कडू, संजय खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, विलास महल्ले, नरेशचंद्र ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.