ETV Bharat / state

अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या 680 वर; शनिवारी आढळले 30 नवे रुग्ण

अमरावतीत आता कोरोनाबाधितांची संख्या 680 वर पोहोचली आहे.680 पैकी 447 जण बरे झाले आहेत.

Amravati corona update
अमरावती कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 5, 2020, 7:47 AM IST

अमरावती- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे. शनिवारी 30 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. त्यामुळे अमरावतीत आता कोरोनाबाधितांची संख्या 680 वर पोहोचली आहे.

कोरोनाचे हॉटस्पॉट झालेल्या झालेल्या शहरातील अशोकनगर परिसरात शनिवारी 9 कोरोना रुग्ण आढळले आहेत. राठी नगर परिसरात 28 वर्षीय युवकाला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

सिद्धार्थ नगर, पोस्टल कॉलनी, जुनी वस्ती बडनेरा, गोपाल नगर, गोपालनगर, गोविंद नगर, बालाजी मगर, नवाथे नगर, गणेश विहार, विदर्भ प्रीमिअर सोसायटी, बेलपुरा, सराफा बाजार येथील जैन मंदिर परिसर या अमरावती शहराच्या विविध भागात कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू येथे 26 वर्षीय युवकाला कोरोना झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील धानोरा या गावातील 66 वर्षीय व्यक्तीला अमरावतीत कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शनिवारी 378 जणांचे स्वॅब तपासण्यात आले त्यापैकी 30 जणांना कोरोना असल्याचे समोर आले. अमरावती शहरात एकूण 207 ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी 12 जणांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. 680 पैकी 447 जण बरे झाले आहेत. गत 15 दिवसांपासून अमरावतीत दररोज 20 च्यावर कोरोना रुग्ण आढळत आहेत.

कोरोनाचा वाढत कहर असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुढच्या आठवड्यात दोन दिवस जनता कर्फ्यु घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या शनिवारी आणि रविवारी हा जनता कर्फ्यु राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.