ETV Bharat / state

अमरावतीत बंदच्या धसक्याने बाजारात तोबा गर्दी - अमरावती कोरोना न्यूज

अमरावती शहर आणि जिल्हा रविवारपासून संपूर्ण आठवडाभर पूर्णतः बंद राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी अमरावती शहरात नागरिकांनी किराणा, भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आजची गर्दी पाहता कोरोनाचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. रविवारी सुद्धा दुपारी 12 वाजेपर्यंत अशीच गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अमरावतीत शुक्रवारी जिल्ह्यात 1 हजार 125 नव्या कोरोना रुग्णांनाची भर पडली.

amravati corona news
अमरावतीत बंदच्या धसक्याने बाजारात तोबा गर्दी
author img

By

Published : May 8, 2021, 2:27 PM IST

अमरावती - रविवारपासून संपूर्ण आठवडाभर अमरावती शहर आणि जिल्हा पूर्णतः बंद राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी अमरावती शहरात नागरिकांनी किराणा, भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कोणत्याच नियमांचे पालन न करता नागरिकांनी सामाजिक अंतराच्या नियमाचा देखील फज्जा उडवतांना दिसून आले.

अमरावतीत बंदच्या धसक्याने बाजारात तोबा गर्दी

कोरोनाग्रस्तांचा रोजचा आकडा हजारावर -

अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या गत चार दिवसांपासून एक हजाराच्या वरच्या संख्येने वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 1 हजार 125 नव्या कोरोना रुग्णांनाची भर पडली तर गुरुवारी 1 हजार 189 कोरोना रुग्ण आढळले. बुधवारी हा आकडा 1 हजार 189 इतका होता. जिल्ह्यात सध्या 9 हजार 961 कोरोना रुग्ण आहेत.

कोरोनाला न घाबरत नागरिक रस्त्यावर -

रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर शुक्रवारी जाहीर केला. सर्व शासकीय कार्यालय सुद्धा बंद राहणार असून घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान हे नियम रविवारी दुपारपासून अंमलात येणार असताना अमरावती शहरातील किराणा दुकानं, मॉल तसेच इतवारा बाजार या मुख्य बाजारपेठेत सकाळपासून प्रचंड गर्दी झाली. अनेक दुकानात पाय ठेवायलाही जागा नव्हती अशी परिस्थिती होती भाजी बाजारातही अक्षरशः लोक एकमेकांवर तुटून पडले होते असे चित्र होते.

कोरोना वाढण्याचा धोका -

आजची गर्दी पाहता कोरोनाचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. रविवारी सुद्धा दुपारी 12 वाजेपर्यंत अशीच गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - सेंट्रल व्हिस्टाच्या प्रकल्पात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.