अमरावती - कोरोनाग्रस्त माजी राज्यमंत्र्यांनी उपचारासाठी अमरावतीऐवजी नागपूर गाठले आहे. यामुळे अमरावतीच्या वैद्यकीय सुविधेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी येथील रुग्णालयात विशेष कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी अमरावती शहरातील एका राजकीय पक्षाचे नेते आणि राज्याच्या माजी राज्यमंत्र्यांना कोरोना असल्याचे समोर आल्यावर ते एका रात्रीसाठी कोव्हिड रुग्णालयात दाखल झाले होते. सकाळी त्यांनी मला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घ्यायचे, असे सांगितल्यावर त्यांना विशेष व्यवस्थेत नागपूरला हलविण्यात आले आहे.
एकीकडे कोरोनामुळे गरीब असो वा श्रीमंत सर्वांसाठी डॉक्टर एकच असा संदेश देशभर जात असताना माजी राज्यमंत्र्यांना अमरावती शहरातील डॉक्टरांवर विश्वास नसणे हेच त्यांच्या कृतीद्वारे स्पष्ट होते. सुपर स्पेशालिटी सारखे रुग्णालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय असताना कोरोना चाचणी प्रयोगशाळा संत गाडगेबाबा विद्यापीठला मिळणे हे सुद्धा अमरावतीच्या वैद्यकीय क्षेत्रावर आक्षेप निर्माण करणारेच निर्णय आहेत.
जिल्ह्यातील एक आमदार आजारी झाले होते. त्यांना कोरोना असल्याचा संशय असताना ते खासगी रुग्णालयात दाखल होतात हा देखील चिंतेचा विषय आहे. शहरातील काही खासगी डॉक्टारांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेत होते. उपचारादरम्याने मृत्यू होताच त्यांचे मृतदेह कोव्हीड रुग्णालयात पाठविण्याचा प्रकारही घडला आहे. यामुळे अमरावतीच्या वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - कवळ्याच्या पिकाला ग्राहक मिळेना; बग्गी येथील शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका