अमरावती - गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली अमरावतीची कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पूर्वरत सुरू झाली आहे. बुधवारी येथील व्यापाऱ्यांशी प्रशासनाने चर्चा करून बाजार समितीतील व्यवहार बंद केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे होणारी कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी नमते घेऊन मालाची खरेदी सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात पडून होता. काही दिवसांवर पेरणीचा हंगाम असल्याने शेतकर्यांना पेरणी कशी करावी, असा प्रश्न पडला होता. यामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांची तत्काळ एक बैठक घेतली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्याचा इशारा व्यापाऱयांना दिला गेला. त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाली आहे.