अमरावती- अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून कर्तव्यावर असलेल्या एका माजी सैनिकाचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्यापही न दिल्याने या माजी सैनिकाने अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संदीप रोंघे असे या माजी सैनिकाचे नाव आहे.
संदीप रोंघे यांची प्रतिक्रिया संदीप रोंघे यांनी तब्बल १९ वर्षं सैन्यात राहून देशसेवा केल्यानंतर ते आता मागील सहा वर्षांपासून अमरावतीमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून कर्तव्यावर आहे. या महाविद्यालयात काम करणाऱ्या सर्व लोकांचे वेतन हे 4 तारखेलाच झाले असून फक्त मलाच वेतन मिळाले नसल्याचा आरोप या उपोषणकर्त्या माजी सैनिकाने म्हटले आहे. मला हेतूपुरस्सर प्राचार्यांनी वेतन दिले नसल्याचा आरोप या माजी सैनिकांनी केला आहे. या वेतनाबद्दल प्राचार्यांना विचारणा करायला गेलो असता, त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोपही या माजी सैनिकाने केला आहे.हेही वाचा- यंदा फटाके विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट; कोरोनामुळे व्यावसायिक हवालदिल