अमरावती - नांदगाव खंडेश्वर शहरातील बाजारपेठमध्ये खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी पहायला मिळत होती. यामुळे शहरात सोशल डिस्टंन्सिग पालन होताना दिसत नव्हते. मात्र, बुधवारी (दि.13 मे) रोजी नांदगाव नगरपंचायत येथे नुतन मुख्याधिकारी मिनाक्षी यादव या रुजू होताच, त्यांनी पहिल्याच दिवशी पोलिसांच्या मदतीने नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मिनाक्षी यादव यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या, मास्क न लावणाऱ्या, दरफलक नसणाऱ्या दुकानदारांवर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई दंडात्मक कारवाई केली. यासाठी त्यांनी नांदगाव पोलिसांचीही मदत घेतली.
नांदगाव तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याने काही नियम शिथील करण्यात आले होते. यामुळे अनेक जण शासनाच्या नियमांची पायमल्ली करत होते. अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर पुन्हा जर नियमांचे भंग करताना आढळ्यास गुन्हा दाखल करुन दुकाने सील करण्यात येतील अशी तंबीही मुख्याधिकारी मिनाक्षी यादव दुकानदारांनी दिली.
हेही वाचा - परतवाड्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; मात्र, पोलीस ठाण्याच्या संपर्कात नाही