अमरावती - शहरातील अचलपूर रस्त्यावरील नवसारी परिसरात असलेल्या यश बार समोर सहाजणांनी एका तरूणाला मारहाण केली. भूषण पोहकर(वय २१), असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. आरोपींनी जुन्या वादातून भूषणला लोखंडी रॉड, काठ्या, चाकू आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी सहा पैकी पाच आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा - MIDC वर हॅकर्सचा डोळा? हॅकर्सने केली तब्बल ५०० कोटींची मागणी