ETV Bharat / state

अमरावतीतल्या शेतमजुराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक

रोशन आता महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणार आहे. कुठलेही शिकवणी वर्ग न लावता केवळ वाचनालयात तासंन् तास बसून त्याने हे यश संपादन केले असल्याचे रोशनचे मित्र सांगत आहेत.

author img

By

Published : Mar 9, 2019, 11:59 PM IST

अमरावती - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या पीएसआय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत तिवसा तालुक्यातल्या पालवाडी गावातला तरुण उत्तीर्ण झाला आहे. रोशन राऊत असे त्याचे नाव असून तो एका शेतमजुराचा मुलगा आहे.

रोशन आता महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणार आहे. कुठलेही शिकवणी वर्ग न लावता केवळ वाचनालयात तासंन् तास बसून त्याने हे यश संपादन केले असल्याचे रोशनचे मित्र सांगत आहेत. पालवाडी गाव अमरावती शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. गावतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रोशनने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण कुऱ्हात पूर्ण केले. त्यानंतर त्याने तिवसात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. रोशन सकाळी शेतातील कामे करत असे. त्यानंतर तो तिवसातल्या राजर्षी शाहू महाराज वाचनालयात रात्री १० वाजेपर्यंत अभ्यास करत होता. त्यासाठी तो रोज ३ किमी पायी जात असे. रोशनने परीक्षेची तयारी २०१६ पासून सुरू केली होती.

अभ्यास व चिकाटीच्या जोरावर रोशन अधिकारी बनला असल्याचे मत रोशनच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले. रोशनला अभ्यास करत असताना अनेक अडचणी आल्या, तरी पण तो खचला नाही. अभ्यास सातत्याने करत राहिला. त्यामुळे तो आज अधिकारी बनू शकला असल्याचे गावकरी म्हणत आहेत. मी माझा अभ्यास यापुढे सुरू ठेवणार असून मला उपविभागीय पोलिस अधिकारी बनायचे आहे, असे रोशन यावेळी म्हणाला.

Intro:
अमरावती अँकर

नुकताच महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला या निकालात राज्यभरातील अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे .दरम्यान अमरावती जिह्यातील तिवसा तालुक्यातील पालवाडी या छोट्याशा गावातील रोशन राऊत हा शेतकरी शेतमजूर गरीब कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाला असून तो आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून शासनात काम करत आहे .एम पी एस सी सारख्या खरतड परीक्षा देत असताना कुठलेही शिकवणी वर्ग न लावता केवळ वाचनालयात तासंतास बसून त्याने हे यश संपादन केले .याच रोशन चा पाहूया खरतड मार्गातील यशाचा हा स्पेशल रिपोर्ट.

Body:vo -1
हे आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील छोटस
पालवाडी गाव अमरावती पासून 50 किमी अंतरावर असलेलं खेड ज्या खेड्यात स्वत्रांताच्या 70 वर्षा नंतर आता कुठे येथे बस यायला लागली.शंभर उंबरठ्याच्या या गावात शेती हाच मुख्य व्यवसाय मूलभुत शिक्षण म्हनजे जमतेम चौथी पर्यत शाळा याच जिल्ह्या परिषदेच्या शाळेत रोशन ने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले .आई वडिलांचं आयुष्य शेतीत अवघ शेतीच्या मागे पण आपला पोरगा मोठ्या पनी मोठा साहेब व्हावा ही त्या माऊलीची इच्छा होती .मुलगा पास झाला आणि तो आता साहेब झाला हे सांगत असताना त्या माऊलीचा आनंद थांबत नव्हता.

बाईट-रोशन ची आई

रोशने गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्याने तालुक्यातील कव्हड गव्हाण ,वाथोडा, कुऱ्हा, आणि तिवसा येथे पदवी पर्यंत शिक्षण घेतले .गरिबीची परिस्थिती आणि ध्येय समोर असल्याने तो खचला नाही .सकाळी शेतातील कामे करून 10 वाजता पासून तिवसा येथील श्री राजर्षी शाहू महाराज वाचनालयात तो रात्री 10 वाजेपर्यंत अभ्यास करत .दळण वळणाची व्यवस्ता फारशी नसल्याने नेहमी 3 किमी पायदळ ही रोशन जात असे .

बाईट-2 रोशन राऊत .

2016 पासून अभ्यासाला सुरवात केलेल्या रोशन ला परीक्षा काळात अनेक चढउतार चढावे लागले .अनेकदा एक एक मार्कने त्यांची संधी गेली असे असताना आज तो पोलीस उपनिरीक्षक झाल्याने त्याच्या गावतही आनंदाचे वातावरण आहे.

Conclusion:महाराष्ट्र राज्य सेवा आयोगात उत्तीर्ण झालेल्या शेतकरी कुटूंबातील रोशन ला एवढ्यावरच थांबायचे नसून पुढेही अभ्यास करून त्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.