अमरावती - श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 97.23 टक्के लागला. प्रज्वल साळुंके या विद्यार्थ्याने 93.08 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम स्थान पटकावले. एकूण अकरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून सर्व गुणवंतांचा प्राचार्य डॉ. व्ही. जी ठाकरे यांनी सत्कार केला.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. 93.08 टक्के गुण प्राप्त करणारा प्रज्वल साळुंके, 92.92 टक्के गुण मिळणारा शिवम दीक्षित, 92.31 टक्के गुण प्राप्त करणारा संकल्प गावंडे, 91.38 टक्के गुण मिळवणारी ईश्वरी ठाकरे, 91.38 टक्के गुण प्राप्त करणारी साबरी अनम मोहम्मद, 90.62 टक्के गुण मिळवणारी तनाया चौधरी, 90.46 टक्के गुण प्राप्त करणारी निहारीका बारबुद्धे, 90 टक्के गुण मिळवणारी वेदानी इंगळे, श्रुती देशमुख आणि हर्षदा काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.